‘दुःखवर्णनाचे वर्णन’ यावर तीन कविता लिहीत आहे. पहिली कविता, सुरूवात; आत्ता देतोय.
दुःखवर्णनाचे वर्णन- सुरूवात
शब्द दुःखांना न्हाऊ माखू घालतात
सजवतात
शब्दरूप देतात.
आणि दुःखांना मिळतात
टाळ्या आणि उसासलेली दाद
दुःखाच्या काळ्या ढगांना
लाभते शब्दकांचनी किनार
दुःखाला शब्दांत मांडणं हे असं असतं
कुणाला सांगायला जावं तर किनारीपुरतं असतं
घोटाळतात शब्द किनार्यावर
एखाद्याने मारलाच सूर खोलवर
तर
तारसप्तकात पिचल्या आवाजासारखा
खुपत रहातो शब्द
आतल्या आत श्वास गुदमरतो
तडफडतो शब्द
आणि दाद मिळत रहाते
शब्दकांचनी किनारीला…
क्रमशः








शब्द दुःखांना न्हाऊ माखू घालतात
ha thought ch mast aahe…. AawaDli