दुःखवर्णनाचे वर्णन- मध्य
तो तडफडता शब्द
गप्प बसत नाही
धुंडाळतो आजूबाजूचं जग
कानोसा घेतो
समृद्ध होत रहातो
दुःखकाळ्या श्वासांनी
खारट अश्रूंनी
हरलेल्या मनगटागत
थरथरत रहातो…
तडफडत रहातो…
कायम
मग एक वेळ येते
हो तीच वेळ येते
त्या शब्दाला,
(आता निव्वळ शब्द राहिलेला नाही तो!)
बाहेर काढण्याची
पण काळ्या ढगाच्या
गडद भुसभुशीत अस्तित्वात
कसा शोधून काढायचा शब्द
किंवा जे काय असेल ते…
तगला, वाचला, जगला असेल तर ठीक
नाहीतर त्या सुखवर्णनी शब्दप्रभेसारखं व्हायचं
विहरते, नाचते, गाते, फुलते
पण सुख म्हणजे काय ते तिलाही सांगता येत नाही
सुखाच्या सर्व उपमा वापरून
मग त्याच उपमांनाही उपमा देते
डोळे दिपवणार्या क्रिडा करते…
सुखाची अवर्णनीयता अबाधित
क्रमशः








किंवा जे काय असेल ते… haaye….
Zakaaass be