काहीतरी विचित्रच!

सालं गेले काही दिवस फार विचित्रच चाल्लेत. म्हणजे धड ना आजारी अन्‌ धड ना धडधाकट; काहीतरी मधलंच. नाहीतर या अशा दिवसात भर दुपारी कोणीतरी बिना पंख्याचं बसेल का? शिवाय आवाज तरी असा काही खर्जात गेलाय की बोलता सोय नाही! साधारणतः नाना पाटेकर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन वगैरे आजारी पडली तर अश्याच काहीश्या आवाजात बोलत असावीत. पण त्यांच्या नरड्यात मज्जाय हो, माझं काय? मी फोन उचलला तर तिकडून कॉलसेंटरवाले फोनच कट करतात! पुन्हा नको तेव्हा नको तसं वाजणारं नाक आहेच. मैत्रिणींना फोन करायलाही नको. भारीच बोअर झालोय, बुवा!
ते मागच्या फोटोशूटचे फोटो एडीट करायचे राहीलेच आहेत अजून. मी मारे मोठ्या जोशात, आज तर हे काम संपवायचंच म्हणून फोटोशॉप उघडून बसतो… पण आणि तासभर नुस्ता बघतच बसतो. आयला मूडच लागत नाही, राव! कंटाळा कंटाळा तो किती आणि कशा कशाचा यावा!! आंघोळ, टी.व्ही, ऑर्कुट, गाणी, पिक्चर्स, पुस्तकं अगदी झोपेचा सुद्धा कंटाळा. तुळशीचा काढा वगैरे ठीक आहे पण ते महासुदर्शन चूर्ण म्हणजे बापरे बाप. कितीही तोंड धुतलं तरी ती कडूशार चव जात नाही.
मग अजूनच कंटाळा येतो. जसा मला आत्ता यायला सुरूवात झालीये. तेव्हा आता बास झालं ब्लॉगिंग…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s