19
जून
09

फुकट आणि कार्यक्षम!

रोजच्या वापरात येणारी, नेटवर लीगली फुकट मिळणारी, अनेकदा विंडोजसोबत येणार्‍या सॉफ्टवेअरपेक्षा चांगल्या रितीने काम करणारी काही सॉफ्टवेअर्स व युटिलिटीज्‌… इथे देतोय. सर्वांनाच उपयोग होईल अशी आशा आहे.

ओपनऑफिस ३ एमेस ऑफिस इतकाच कार्यक्षम, कळायला सोपा आणि सिस्टीमवर हलका असा हा ऑफिस सूट, नेहमीच एमेस ऑफिसच वापरणार्‍यांनाही भुरळ घालतो. शिवाय ओपनऑफिसची फाईल .doc, .docx, .ppt, .xls वगैरे एमेस ऑफिसच्या फॉरमॅट्स मधे सेव्ह करता येते. आणि एमेस ऑफिस मधे नसलेला “export to pdf” हा ऑप्शन तर खूपच कामाचा.

Use OpenOffice.org
विनॅम्प ५.५२ कॉम्प्युटरवर गाणी वगैरे ऐकताना अजूनही अनेकजण विन्डोज्‌ मिडीया प्लेअरच वापरतात. उजव्या कोपर्‍यात वाजणार्‍या गाण्यांची यादी ठेवून बाकी उरलेल्या आख्ख्या स्क्रीनवर धुमाकूळ घालणार्‍या त्या वेड्यावाकड्या रेषा आणि रंग… विनॅम्प सगळ्या प्रकारचे ऑडिओ फॉरमॅट्स वाजवतो. कोडेक नाही अशी फाल्तू सबब तो दाखवत नाही. आतातर यावर आयपॉडसुद्धा सिंक (sync; किचनमधली नाही!) करता येतो!

Get Winamp
व्हिएलसी प्लेअर १ ऑडिओला विनॅम्प आहे तर व्हिडिओला काय? विनॅम्पमधेही व्हिडिओ बघता येतात पण खरंतर पकावगिरी आहे. व्हिडिओला बेस्ट म्हणजे व्हिएलसी प्लेअर. ह्याची बीटावस्था नुकतीच संपली. त्याच्या स्लोगनप्रमाणेच अक्षरशः कोणताही व्हिडिओ प्ले करतो आणि नेटवर स्ट्रीमही करतो.

Get VLC media player
७-झिप ४.६५ कंप्रेशन किंवा झिपिंग यामधे सगळेच हात मारतात असं नाही. अनेकांच्या कॉम्प्युटरमधे जुन्या विनझिपचं अनंतकाळ चालणारं ट्रायलव्हर्शन पडलेलं असतं. त्या बाबा आदम जमान्यातल्या अर्धवट चालणार्‍या ट्रायलव्हर्शनला उत्तम पर्याय म्हणजे हे लेटेस्ट फ्रीवेअर. झिप, रार, टार शिवाय ७झिप या स्वतःच्या फॉरमॅटमधेही फाईल सेव्ह करतो.

7-Zip
फॉक्सिट रिडर ३ अडोब/ऍक्रोबॅट रिडर तुमच्या कॉम्प्युटरवर फार खाऊन खाऊन सुटलेल्या ढोल्या माणसासारखा हळूहळू चालतो का? नाही, खरंय ते. तो २० एम्बीचा गेंडा चालवण्यापेक्षा ३ एम्बीचा फॉक्सिट रिडर कधीही चांगलाच! ह्याचं सगळं फटाफट फाईल चालू बंद सगळंच. क्रॅश म्हणून नाही. वापरून तर बघा, म्हणजे आपोआप कळेल मी काय, म्हणतोय ते!

जिम्प्‌ २.६ तुमच्या कॉम्प्युटरवर चालणार्‍या त्या पायरेटेड फोटोशॉपला तितकाच कड्डक पर्याय. ह्या जिम्पच्या नावातच सगळं आलं. (GIMP – GNU Image Manipulation Program) शिवाय फोटोशॉपची सवय असणार्‍यांसाठी ह्याचा चेहरामोहरा (UI) अगदी फोटोशॉपसारखा करता येतोच. तेव्हा, फुकट फोटोशॉप म्हणजे जिम्प्‌!
GIMP - Free
सीक्लिनर २.२० विंडोज कधी अचानक स्लो होतं, एखादी वेबसाईट नीट लोड होत नाही, हार्डडिस्कवरील रिकामी जाग अचानक भरते, काही फाईल्स डिलीटच होत नाहीत, काही फाईल्स, सॉफ्टवेअर्स काढून टाकले तरी त्यांचे शॉर्टकट्स, रजिस्ट्री एन्ट्रीज्‌ तशाच पडल्यात; ह्या व अशा अनेक समस्या आपल्याला छळतात. त्यावर मस्त उपाय. इसे वापरीये और फरक देखिये. टिंग टींग टिडींग!
CCleaner - Freeware Windows Optimization
गमभन आणि बरहा गमभन आणि बरहाबद्दल काय लिहू? जे नियमित ब्लॉगिंग करतात ते प्रामुख्याने या दोन पैकीच एक टूल वापरतात. गमभनचं ऑनलाईन टूल आहे; बरहाचं नाही. पण बरहाचे बरहापॅड, बरहाकन्व्हर्ट, बरहासॉर्ट असे उपयुक्त प्रॉग्रॅम्सही जोडीला आहेत.अगदीच फरक करायचा झाला तर, गमभन ओंकार जोशी यांनी बनवलंय तर बरहा शेषाद्रीवसु चंद्रशेखरन् यांनी.‌ शिवाय इथे द्यायला बाजूचं वेब बटन/ग्राफिक लिंक लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल ओंकार जोशींचे आभार

Download gamabhana

बघा वापरून आणि सांगा मला कशी काय वाटली ही फुकट आणि कार्यक्षम सॉफ्टवेअर्स!
धन्यवाद.

आल्हाद

Advertisements

6 Responses to “फुकट आणि कार्यक्षम!”


 1. जून 19, 2009 येथे 9:56 म.उ.

  यादी उपयुक्त आहे. Winamp आता ब्लोटवेअर झालेला आहे. Media Player Classic हा त्याला चांगला व छोटा पर्याय आहे. त्याच्या सोबतीने Real Alternative व Quick Time Alternative सुद्धा संगणकावर प्रस्थापित केल्यास Real Player व Quick Time Player ची आवश्यकता राहात नाही.
  Norton Antivirus किंवा McAffee Antivirus ऐवजी Avast किंवा AVG Free हे दोन चांगले फुकट पर्याय आहेत. Spybot – Search & Destroy हे उत्तम anti-malware आहे.

  • 2 आल्हाद alias Alhad
   जून 19, 2009 येथे 10:19 म.उ.

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
   विनॅम्प बाबतीत तुमचा मुद्दा खराय पण performanceवर अजूनही फरक पडलेला नाही… ऍन्टीव्हायरस, ऍन्टीमालवेअर हा मोठा टॉपिक आहे; त्यावर वेगळीच पोस्ट करणे श्रेयस्कर!

   आल्हाद

 2. 3 hemantpali
  जून 19, 2009 येथे 10:39 म.उ.

  अप्रतिम माहिती आहे

 3. जून 20, 2009 येथे 8:18 म.पू.

  अरे वा… मस्त आहेत सगळी सॉफ्ट वेअर्स.. धन्यवाद..
  एक स्नॅग इट नावाचं सॉफ्ट वेअर पण मस्त आहे स्क्रिन कॅप्चरिंग प्रोग्राम आहे हा. माझ्या कम्प्युटरला आमच्या ऍडमिनने लोड करुन दिलंय..

 4. 5 आल्हाद alias Alhad
  जून 20, 2009 येथे 7:13 म.उ.

  हेमंतपाली, महेन्द्र कुलकर्णी
  प्रतिक्रियेसाठी आभार…
  मी अजूनतरी Prnt Scrn- Paste in MS Paint- Save in JPEG हाच मार्ग वापरतो…
  🙂

  आल्हाद

 5. 6 Omkar
  ऑक्टोबर 26, 2009 येथे 4:06 म.उ.

  चांगली आहे लिस्ट!
  फोटो पहनया साठी कधी तरी FastStone Image Viewer try करा
  सो कॉल्ड फुकट आहेच पण खुप छान आहे!
  Anyways Thanx a lot!


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

 • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: