फक्त दोन ओळी…

पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार

परवापासून फक्त ह्याच आणि एवढ्याच ओळी सुचल्यात. ह्यापुढे लिहायला ओळीच सुचत नाहीयेत. आणि ओळी सुचायला कसलीच कल्पनाही डोळ्यासमोर येत नाहीये. Absolutely nothing.

आता हे जर असं असेल तर मग ह्या ओळी तरी का सुचल्या? (असाव्यात?) जवळपास डझनभर वेळा वाचून झाल्यात ओळी. काहीही फायदा नाही. तर मग ह्या इन मीन दोन ओळी का सुचल्या?

आपल्याला झालंच का असं कधी? अशा अर्धवट राहीलेल्या कल्पनांनी कधी छळलंय? मग काय केलंत आपण अशावेळी?
वि.सू.: हे लिहीता लिहीता सुद्धा अगणित वेळा वाचून झाल्यात या ओळी… … … But no success!

Advertisements

12 thoughts on “फक्त दोन ओळी…”

 1. बरं झालं तुला आणखी पुढे काही सुचत नाहीय्….
  केवळ या दोन ओळी वाचूनच प्राण कंठाशी आला…
  नशिब, आणखी काही लिहीलेलं वाचावं नाही लागलं….आभार….किमान माझा जीव तरी वाचला….!

 2. इंदिरा संतांचं पण असंच व्हायचं !एखादी ओळ डोक्यात खुप दिवस घोळत रहायची आणि नंतर एकदम एखाद्या फांदिला धुमारे फुटावे तसे त्याला कवितेचे शब्द सापडायचे. मनात त्याच ओळी घोळवत रहा, कोण जाणे , कदाचित कविता पण तयार होईल… शुभेच्छा..

 3. होतं ना खूप दा होतं ्सं मग त्.ा वेळी त्या लिहून ठेवून द्यायच्या नंतर केंव्हां तरी वही उघडली कि सुचतात पुढच्या ओळी

 4. @ निमिषा,
  प्राण का बरं कंठाशी आला? एवढ्या हिंसक आहेत या ओळी??

  @ महेन्द्र,
  चला, म्हणजे मोठ्ठा कवी होण्याचं एक तरी लक्षण आहे माझ्यात… 🙂

  @ आशा जोगळेकर,
  हं, सुचेल अशी ’आशा’ लावूनच आहे मी!

  @ वाय.डी.,
  काही म्हणता काहीही सुचलेलं नाही… 😦

  @ इंकब्लॅकनाईट,
  हं, ठेवूनच दिलंय बाजूला. आता लहर लागली की बघू…

 5. अरे तु असं ‘पांढराभक्क’आणि ‘काळाढुस्स्’ सारखे बटबटीत शब्द या सुंदर पावसाळी वातावरणांत का वापरतोयस्?
  जरा बाहेर मस्त मोकळ्या निसर्गाकडे एक नजर टाक नं …कीती तरी मोहक रंग दिसतील तुला आणि ह्या बटबटीत ओळीनां तिलांजली देऊन एखादी छान कविता सुचेल तुला पट्कन्…अडणार नाहीस असा मध्येच कचकन ब्रेक लावल्यासारखा…सॉरी मी मला वाटलं ते सांगून टाकलंय्..

  1. सॉरी म्हणण्यासारखं काहीही नाहीये गं निमिषा…
   आजूबाजूचं वातावरण कितीही सुंदर असलं तरी मला कधी काय सुचेल यावर माझाही कंट्रोल नाहीये खरंतर!
   🙂

 6. पांढरा-भक्क उजेड
  बाहेर काळा-ढुस्स अंधार …
  मधे ही खिड़की …
  माझ्या मनाची …
  खिडकीला …
  पावसाच्या सरीच्या पापण्या !!

  asa kaahee malaa suchla ya oLee waachun .. 🙂 aani ho .. mala haaiku baddal phaar mahitee naahee .. tyamuLe majhee tee kavita haaiku hoil ka he maahit naahee .. thanks for a comment ..

 7. “पावसाच्या सरीच्या पापण्या”
  व्वा, प्रदीपराव. या शेवटच्या ओळीनी मजा आणली.

  मलाही माझं काहीतरी सुचेलंस वाटतंय आता!

  धन्यवाद…

 8. हो अगदी बर्‍याचदा अशा चारोळ्या मनात घोळत राहिल्यात. काही दिवसांपूर्वीच…इंदिरा संताची ’निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झ्बे लालसर ल्यावे काही….’ कितीतरी दिवस गुणगुण चालली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s