बेबलॉश्की

“मांजर बेबलॉश्कीचं असो किंवा जोनाथनचं, या मांजरांना झोपा काढण्याशिवाय दुसरे उद्योग नसतात असं माझं स्पष्ट मत आहे.”, बेबलॉश्की त्याच्या मांजरावरून अखिल मार्जारजातीचं व्यक्तिचित्र चितारत होता. स्वतः बेबलॉश्कीच्या दृष्टीनं ही कृती म्हणजे साक्षात साहित्यसेवा तर त्याच्या गुमान डोळे मिटून पडलेल्या मांजराच्या मते, नीनाच्या गोग्गोड आठवणींतून बाहेर पडण्याचा एक मार्ग होता. “आता हे त्या मांजराला कसं कळलं हे मात्र विचारू नका. असल्या नसत्या मतांच्या अन्‌ फिलॉसॉफ्यांच्या बाबतीत तो स्वतःचा कृतीबंधू गारफिल्डाचा आदर्श ठेवून आहे.”, बेबलॉश्कीची साहित्यसेवा चालूच होती.

इकडे बिचार्‍या त्या हिरव्या काळ्या मांजराला कसंतरीच व्हायला लागलं. त्याच्या दुपारच्या दुध-बिस्कीटाची वेळ टळून चालली होती. कितीही म्यावम्यावून किंवा बेबलॉश्कीला बोचकारूनही उपयोग नाही हे एव्हाना त्याला अनुभवानं माहीत झालं होतं. आता या कुपोषणातून त्याला वाचायची एकच आशा होती; नीना. किंवा तिचा कपकेक. मग त्याने फिसकारत दोन नि:श्वास सोडले. “ए, गप रे!” बेबलॉश्की गळा फाडून ओरडला. आणि दुप्पट त्वेषाने साहित्यसेवा करू लागला…

“टिंग टॉंग” बेल वाजली. बेबलॉश्की पेन आपटत दार उघडायला उठला. मांजराने फक्त कान टवकारण्याएवढेच कष्ट घेतले. दारात साक्षात नीना उभी होती. ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडेसे आसू. ती आत आली. बेबलॉश्कीच्या साहित्यसेवेच्या खुर्चीवर बसली. “आय ऍम सॉरी, रे.” , म्हणाली. चला म्हणजे हिला मांजराशी खेळायंच नाहीये तर. बेबलॉश्की एकदम साहित्यिक हसला अन्‌ तिला हलक्या मिठीत घेतलं.

आता कोणत्या मांजराला आपल्याशिवाय कुणी मालकाच्या मिठीत शिरलेलं आवडेल? अर्थात्‌, नीनालाही कल्पना होतीच. बेबलॉश्कीला मिळाली नीना आणि मांजराला त्याचा कपकेक!!!

तळटिप:

१) बेबलॉश्की ही निवेदिता बर्वे यांची निर्मिती आहे. हे पात्र विना परवानगी वापरल्याबद्दल जाहीर माफी.

२) वरील टिप योग्य ते शब्द बदलून वाचावी.

३) पहिली टिप परत एकदा योग्य ते शब्द बदलून वाचावी.

४) ही तिन्ही पात्रं व ह्याप्रकारे लिहायची ’टिंबकथा’ नावाची पद्धत, ह्या सगळ्यासाठी मी निवेदिता बर्वे यांचा आभारी आहे.

Advertisements

2 thoughts on “बेबलॉश्की”

 1. निवेदिता यांचे बेबलॉश्की आणि त्याचे काळे-हिरवे मांजर माझे फेवरिट आहेत. (आणि बरोबरची देबू यांची चित्रे सुद्धा.)

  पोस्ट वाचताना वरिजिनल इतकी मजा आली नाही. शोले नंतर रामूचा आग बघताना जसे वाटले तसे काहीसे वाटले. :प

  1. “पोस्ट वाचताना वरिजिनल इतकी मजा आली नाही.”
   साहजिक आहे… त्यांना इमिटेट करायचा कोणताच प्रयत्न करायचा नव्हता…

   आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आभार!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s