29
ऑगस्ट
09

माझा देश कसा चालतो…?

परवाच निवडणूक कार्यालयात परत एकदा जाणं झालं. या परत एकदा असं लिहिण्याचा खरा अर्थ अकराव्यांदा-बाराव्यांदा जावं लागलं असा आहे. अर्थात अजून काम झालेलंच नाही. मुळात गेली लोकसभा निवडणूक आमची मुंबईत आल्यानंतरची पहिलीच. त्यामुळे नव्याने मतदार ओळखपत्र काढायची धांदल. धांदल म्हणजे त्या सरकारी लोकांची; आमची नाही. अगदी ते फॉर्म्स सबमिट करतानापासून बघतोय, धांदल, गडबड, गोंधळ, भांडण, बाचाबाची ह्याशिवाय दुसरं काही नसतंच. तरी आपण तसे सिव्हीलाईज्ड लोक म्हणून बरं, नाहीतर भोसकाभोसकी किंवा गोळीबारसुद्धा झाला असता अफगाणिस्तान ईश्टाईल.
फॉर्म्स सबमिट झाले. तोपर्यंत लोकसभा निवडणूक संपली… आता विधानसभेसाठी तरी नाव येतंय का त्यासाठी खेटे घालणं चालूये. तर हे निवडणूक कार्यालय म्हणजे महापालिकेची शाळा. शांत. एका वर्गात शिरलो. समोरच्या टेबलामागे खुर्चीवर एक माणूस, डेनीमची कॅप घालून काडी चघळत बसला होता… त्याला माझ्या फॉर्मच्या काउंटरस्लीप्स दिल्या आणि यादीत नाव आहेत का? असं विचारलं. त्या का.स्ली. त्याने बघितल्या आणि बाजूच्या माणसाकडे बोट केलं. बोलताना तोंडातली काडी पडली म्हणजे?! तिथल्या हवेचाच दोष असावा बहूतेक; ह्या टेबलावरून त्या टेबलावर जाताना एक कडाडून येणारी जांभई कशीतरी थोपवली. मग मी ही शांतता भंग न करायचं ठरवलं. त्या का.स्ली. त्याच्यासमोर टाकून लिस्ट बघायचीये असे मोजके दोन शब्द बोललो. हा माणूस तर अजूनच वरताण निघाला… टेबलावर पाय टाकून मस्तपैकी एक डुलकी काढू म्हटलं तर कुठून उपटला हा प्राणी अशा प्रकारचे भाव त्याच्या चेहर्‍यावर आले. मग एक मेटामॉर्फोसिस. जनतेचा सेवक वगैरे… हो काल आलेली आहे नवीन यादी पण ती अजून पब्लिश झालेली नाही तेव्हा तुम्ही ३१ तारखेला या… आता ती यादी अशी केंद्रांकेंद्रांवर गेल्यावर अजून वेगळी ’पब्लिश’ होत असते हे आजवर कोणीच कसं बोललं नाही??
आज पेपरात वाचलं १ सप्टेंबर पासून आचारसंहिता लागू होणार म्हणून…
आपल्या लोकशाहीत निवडणूकीसारख्या मूलभूत गोष्टीबद्दलच इतके घाणेरडे आणि विचित्र गोंधळ असतील तर कसा बरं चालतोय हा देश???

कशाही प्रकारे चाल्लेली लोकशाही आहे झालं!

Advertisements

2 Responses to “माझा देश कसा चालतो…?”

  1. ऑगस्ट 30, 2009 येथे 9:50 म.पू.

    आता पटली खात्री देव आहे म्हणुन… नाही तर कसा चालला असता हा देश?

  2. 2 hemant athalye
    सप्टेंबर 16, 2009 येथे 6:19 म.उ.

    हो ना, माझ्या नव्या रेशन कार्ड साठी मी मागच्या तीन महिन्या पासून खेटे मारतो आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

एकूण वाचक

  • 32,576 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

लोकप्रिय लेखन

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: