09
सप्टेंबर
09

जिममधला माणूस

काही काही माणसांकडे उगाचच आपलं लक्ष वेधलं जातं. फार काही न्याहाळावं, बघावं असं, उत्सुकता वाढवणारं असं काहीही (रुढार्थाने) नसलं तरी. तरीही काही माणसं आपल्या कुतूहलाचा विषय बनतात. आता ह्या माझ्या जिममधल्या माणसाबद्दलच बोलायचं झालं तर, जिममधे येणारे लोक फार टिप्पीकल असतात. उदाहरणार्थ, जिममधे येणारी बाई/मुलगी, तिचं वय, वजन, आकार, वर्ण काहीही असला तरी तिच्या ट्रॅकपॅंट-टीशर्टाचा रंग गुलाबी असतो. छातीपेक्षा पोटाचा घेर दुप्पट असलेला कुणीतरी एखाद्या नवीन बारक्या पोराला वजन वाढवायचे सल्ले देत असतो. ट्रेडमिलवर पळून किंवा वजनं उचलून घामाने चिकट झालेले सगळे चेहरे सुद्धा सारखेच वाटतात. अवतीभोवती तो इन्स्ट्रक्टर निर्विकार चेहर्‍याने (पण अजस्त्र छाती पुढे काढून) इकडे तिकडे फिरत असतो; जे इन्स्ट्रुमेन्ट रिकामं असेल त्याप्रमाणे व्यायाम वाटत असतो! वजनदार बारबेल्स, डंबेल्स परत जागेवर ठेवताना होणारे आपटल्यासारखे आवाज, स्वतःच्या वजनाएवढं वजन छातीवर घेऊन उचलणार्‍यांचे बुभुःकार असल्या सगळ्या आवाजांना लपेटून उरणारा हिंदी/इंग्लिश गाण्यांचा आवाज असं सगळं थोड्याफार तपशिलाच्या फरकाने सगळीकडे सारखंच असतं.

या सगळ्यात हा माणूस उठून दिसला नाही तरी वेगळा मात्र वाटतो. निव्वळ बाह्यवर्णन करायचं झाल्यास, आळशी हजामाने केल्यासारखा क्रू कट, वाढलेली थोडीफार पांढरी दाढी, उफराटं नाक, त्यातून डोकावणारा एखाद्‍दुसरा पांढरट केस, दणकट फोर-आर्म्स, प्रायोगिक नाटकवाल्याप्रमाणे विचित्र रंगसंगतीची अर्धी चड्डी आणि टीशर्ट आणि बिनमोज्यांचे शूज्‌; असा सगळा प्रकार आहे. अशा प्रकारच्या माणसाकडे कोणी मुद्दामहून दुसर्‍यांदा बघेल का? अर्थात्‌ जरा जास्तच खरं आणि सरळसोट वर्णन केल्यानं तुमचं उत्तर ’नाही’ असं असेलही. पण मी तरी अनेकदा त्याच्याकडे नजर टाकतो. हा असा माणूस जिममधे व्यायाम करायला येतो. खरंतर या वाक्यात नवीन असं काही नाही पण हा माणूस ’फक्त व्यायामच’ करतो. गेले इतके दिवस, मी किंवा माझ्यासारखे इतर, त्याच्या आजूबाजूला व्यायाम करतोय पण त्याच्या नजरेत जरा तरी ओळख दिसेल तर शपथ!

कोण असेल हा माणूस? कुठे रहात असेल? काय करत असेल? जिमच्या बाहेर तर कधी दिसला नाही. किंवा जिममधे येताना किंवा जिममधून बाहेर पडतानाही नाही. भूत बीत तर नसेल? असलं अक्षरशः काहीही बाकी ठेवत नाही मी.

आता या धड ओळख पण नसलेल्या माणसाबद्दल आख्खी एक ब्लॉगपोस्ट काय लिहू? अर्थात्‌, इमॅजिन-इम्प्रोव्हाईज करून लिहीता ही आलं असतं अजून खूपकाही. पण मग तो त्या प्रत्यक्षातल्या माणसावर उगाचच अन्याय झाला असता…

तेव्हा जे वाटलं, जसं वाटलं, ज्या गोष्टीबद्दल मजा वाटली ती शेअर केली.

एवढंच!

Advertisements

0 Responses to “जिममधला माणूस”  1. टिपणी करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: