पांढराभक्क उजेड काळाढुस्स अंधार

साधारण दोन महिन्यांपूर्वीच मी लिहिलं होतं, दोन ओळींतच अडून राहिल्याबद्दल. ह्या गेल्या दोन महिन्यात खूप काही घडलं, घडता घडता राह्यलं, कधी भिती वाटली, कधी एकटेपणा वाटला, प्रचंड आनंदही झाला. पण त्या दोन ओळींमध्ये अजूनही अडकलो होतो. काल रात्री साडेबारा-पावणेबाराच्या दरम्यान काहीतरी झालं. कविता लिहिली. यमकं वगैरे काही नाही. फक्त एकाखाली एक ओळी. मुक्तछंद म्हणा हवंतर…
जो काही कोलाज लिहिला गेला तो असा…
पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार
गरगरणारा पंखा
किरकिरणारे रातकिडे
दूर कुठेतरी वाजणारा भोंगा
भुंकणारी कुत्री
’जागते रहो’
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
इथेच कुठेतरी सभोवताली
एकटा मी.
मांज्यात पंख अडकून
भेलकांडत खाली आलेलं ते कबूतर
कुठल्या नजरेनं बघितलं असेल त्यानं पतंगाकडे
तुटलेल्या पंखाची जखम हुळहुळताना
त्या रात्री कुत्रीही जरा शांत होती;
म्हणे अमावस्या होती.
बाहेर काळाढुस्स अंधार
सिगारेटचं जळतं टोक सुद्धा सूर्य वाटतं.
नव्हे; ती होती चिलीम, अफूची
कबूतरांवर पसा पसाभर धान्य फेकणार्‍याकडे
आशाळभूतपणे बघणार्‍या थोट्या भिकार्‍याची
रातकिडे किरकिरतायत अजूनही
मी ही असाच, इथेच,
अडकलेला
स्वाभिमानी
रांगेतल्या पुढच्यांची हांजी हांजी करत
पुढे जाणार्‍या तद्दन भिकार्‍यांविरुद्ध
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
’जागते रहो’

साधारण दोन महिन्यांपूर्वीच मी लिहिलं होतं, दोन ओळींतच अडून राहिल्याबद्दल. ह्या गेल्या दोन महिन्यात खूप काही घडलं, घडता घडता राह्यलं, कधी भिती वाटली, कधी एकटेपणा वाटला, प्रचंड आनंदही झाला. पण त्या दोन ओळींमध्ये अजूनही अडकलो होतो. काल रात्री साडेबारा-पावणेबाराच्या दरम्यान काहीतरी झालं. कविता लिहिली. यमकं वगैरे काही नाही. फक्त एकाखाली एक ओळी. मुक्तछंद म्हणा हवंतर…

जो काही कोलाज लिहिला गेला तो असा…

पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार
गरगरणारा पंखा
किरकिरणारे रातकिडे
दूर कुठेतरी वाजणारा भोंगा
भुंकणारी कुत्री
’जागते रहो’
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
इथेच कुठेतरी सभोवताली
एकटा मी.

मांज्यात पंख अडकून
भेलकांडत खाली आलेलं ते कबूतर
कुठल्या नजरेनं बघितलं असेल त्यानं पतंगाकडे
तुटलेल्या पंखाची जखम हुळहुळताना

त्या रात्री कुत्रीही जरा शांत होती;
म्हणे अमावस्या होती.

बाहेर काळाढुस्स अंधार
सिगारेटचं जळतं टोक सुद्धा सूर्य वाटतं.
नव्हे; ती होती चिलीम, अफूची
कबूतरांवर पसा पसाभर धान्य फेकणार्‍याकडे
आशाळभूतपणे बघणार्‍या थोट्या भिकार्‍याची

रातकिडे किरकिरतायत अजूनही
मी ही असाच, इथेच,
अडकलेला
स्वाभिमानी
रांगेतल्या पुढच्यांची हांजी हांजी करत
पुढे जाणार्‍या तद्दन भिकार्‍यांविरुद्ध

वॉचमनचा प्रेमळ सल्ला
’जागते रहो’

Advertisements

8 thoughts on “पांढराभक्क उजेड काळाढुस्स अंधार”

    1. आपला अनमान करायचा हेतू नाही पण;
      महेन्द्रराव,
      माझ्या माहितीप्रमाणे असे जोडशब्द हव्या असलेल्या अर्थाप्रमाणे बदलून वापरता येतात…
      उदा.:
      एखादा अतिशय गोरा अगदी व्हिटॅमिन डेफिशियन्ट असलेल्या माणसाचा चेहरा असतो तो – पांढराधोप
      गर्लफ्रेंडच्या गळ्यात गळे घालून फिरताना अचानक बायको समोर आली तर जसा चेहरा पडतो तो – पांढराफटक
      मला इथे डोळ्याला टोचेल इतपत कडक/अतिब्राईट अशा पांढरा प्रकाश या अर्थी हा शब्द वापरायचा आहे…

      भावना पोचल्या असतील अशी आशा.
      आभार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s