लोकल

दुपारी १२. ५९ ची सीएसटी स्लो. १. ०५ ला आली. वेळेवर. आरामात चढण्याइतकीच गर्दी होती. आत आलो. डावीकडे वळून समोर बसायला जाणार तेवढ्यात… तसे माझे डोळे फार कामसू. माझ्याकडे पाठ करून अर्धवट तिरपी अशी खिडकीकडे बघत बसलेली एक मूर्ती. स्कीन कलरचा स्कीन टाईट टॉप. उपकार केल्यागत झाकायला घातलेली टेपर्ड अतिटाईट जीन्स. त्यावर एम्ब्रॉयडरी वगैरे प्रकारचं विणकाम असलेला पट्टा. ती जीन्सपॅंट आणि त्या स्कीन टाईट टॉपमधून दिसणारी अर्धवट राठ लव असणारी कातडी. आली ना किळस? मलाही. ती तिसरी सीट सोडून पुढे जाऊन चौथ्या सीटवर बसलो.
डोंबिवली सुटलं. कोपर रोडला मी फोर्थचा थर्डवर आलो. फोर्थवर कुणीच नाही. माझ्याबाजूची खिडकी धुकाळली होती. मी पलीकडच्या खिडकीतून काय बघावं ते नवलच अशी अवस्था. गेल्या काही दिवसांच्या पावसाने स्वच्छ झालेली, हिरवीगार चकाकणारी खाडी आणि मॅनग्रोव्हज्. कधी नव्हे ते त्या सेंट्रलच्या जुन्यापान्या लोकलमध्ये उकडत नव्हतं. पांढऱ्याफटक ट्यूब्जसुद्धा आनंदी वाटत होत्या. दिव्यानंतर गाडीचा वेग अजूनच वाढला. मस्त विलंबित एकताल वगैरे वाटावा अशी गाडी तालात हेलकावू लागली. खिडकीतून फोफावणाऱ्या थंड वाऱ्यात सगळेच मस्त सुस्तावले होते.
तेवढ्यात तिकडे काहीतरी विचित्र हललं. माझी नजर तिकडे गेली. मगाचचीच ती अर्धवट राठ लव असणारी कातडी वगैरे वाली किळसवाणी मूर्ती. तर ती “ती” नसून चक्क “तो” होता. यक्स. डोक्यासकट आख्खा क्लीऽऽऽन शेव्ह. डोक्यावर फुलाफुलांचा मोठा बंदाना. डोळ्यात काजळ किंवा आयलायनर का काय ते. कानात हेडफोन. नोकरदार बायकांच्या त्या मोठ्ठ्या पर्सप्रमाणे एक मोठ्ठी बॅग मांडीवर. छातीशी घट्ट धरलेली. त्या अतिटाईट जीन्समधले पाय एकमेकांवर इतके घट्ट, की वाटावं (लिटरली) मध्ये काही नाहीच! डब्यातल्या तमाम पुरुषांपासून सांभाळून स्वतःला आखडत बसला होता तो/ती/ते!
सगळ्या आनंदी मूडला ही नवीच बाजू! स्टेशनं येत होती जात होती. प्रत्येक नवीन आलेल्या माणसाची एक कुतूहलाची नजर त्याच्याकडे जायचीच जायची. पार ठाणं जाईपर्यंत त्या बाकावर तो/ती/ते आणि खिडकीशी झोपलेला एक दारुडा याशिवाय कोणी बसलंच नव्हतं… पुढे फारच गर्दी झाली आणि एकजण दाणकन् येऊन बसला तेव्हाचे ते हावभाव म्हणजे सुप्त स्त्रीत्वाच्या अंडरप्लेचं धमाल उदाहरण होतं. तोपर्यंत बाहेरची हिरवाई मागे पडून त्याजागी गर्दी, बिल्डिंग्ज, फॅक्टरीज असा मुंबई फ्लेवर आला होता. घामाशिवाय. दादर येईपर्यंत मलाही काही उद्योग नव्हते. पावसामुळे, वाऱ्यामुळे, थंडीमुळे मूडही मस्त लागला होता. मग करत बसलो त्याच बिचाऱ्या “गे”लेल्याचं निरीक्षण. नेहमी विरुद्धलिंगी निरीक्षणाचा सराव असलेले डोळे ही नवीन काम मन लावून करत होते! मग फोन वाजला. जवळपास किंचाळलाच, “मां, आ राहा हूं! बस दस मिनट!! ” कुर्ल्याला बऱ्यापैकी गर्दी कमी झाली होतीच. आणि ज्यांनी तो आवाज ऐकला त्यांनी काही इकडे यायचं डेरींग केलं नाही… सायनला गाडी आली तेव्हा सावकाश उठून उभा राहिला. स्कीन कलरचा टॉप मागून ओढून खाली केला. आणि कंबर हलवत दरवाज्यापर्यंत पोचला.
आता नजरेआड गेल्याने माझाही इंटरेस्ट संपला… आता अगदीच काही उद्योग नाही म्हटल्यावर माटुंगा सुटेपर्यंत तरी एक डुलकी काढून घावी म्हणून डोळे मिटले…

6 thoughts on “लोकल”

  1. दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

    तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!

    पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s