समजा मी उद्या मेलो

समजा मी उद्या मेलो
आणि तिला कळलंच नाही तर?

मी शांत झोपून
अनुभवत असेन मरण
ती वैतागली असेल
मी फोन उचलत नाही म्हणून
शेवटी कंटाळून ती गच्चीत येईल
चंद्र न्याहाळायला.
ती मला दिसेल, मी तिला नाही.
तेव्हा मला जाळायला आलेले लोक,
कवटी फुटायची वाट बघत असतील.

माझं ऑर्कुट अकाऊंट
माझा ब्लॉग, माझे ईमेल आयडीज्‌
सगळे सुने पडतील…
माझ्या बेवारशी कॅमेर्‍याप्रमाणे
मग तिचा ऑफलाईन मेसेज येईल,
“u der?” इतकाच.
तो ही पडून राहील बेवारशी,
spam फोल्डरमधल्या
लॉटरीच्या, आणि penis enlargement च्या मेल्ससारखा

ती वैतागेल,
स्वतःवरच राग काढेल…
मित्रांना विचारेल.
कोणालाच काहीच पत्ता नसेल.
माझ्या जाण्यानं कोणालाच काहीच फरक पडला नसेल…
तो फरक तिला मात्र जाणवेल…
माझं जाणं तिला कळलं नसलं तरी…
मला ’बेवफा’ वगैरे विशेषणं लावून
पार दूर तिथे घरी बसल्या बसल्या
स्वतःला कोसत राहील
मग कधीतरी लग्न होऊन
परक्याची होईल…
माझ्या फोटोवर कदाचित
आठवणीनं सुती हार पडत असेल

पण मी मेल्याचं तिला अजून कळलंच नसेल…
कदाचित कधीही कळणार नाही…
मग…
तिच्याशी बोलून घेतो आत्ताच
उद्याचं माहीत नाही…
“मेलो तरच तुला सोडून जाईन
अन्यथा नाही!”, घसा फाडून तिला सांगावं लागेल…
यावर तिचा विश्वास बसेल
पण मरणावर नाही

मग मी मेलो तरी मी खरंच मेलोय
यावर तिचा विश्वास बसणार नाही
मरणावर काय बोलायचं म्हणून रागवेल,
समजावेल, रूसेल…

मी काहीच नाही बोलत म्हटल्यावर
शेवटी कंटाळून ती गच्चीत येईल
चंद्र न्याहाळायला….. एकटीच.
माझ्याविना…. कायमची
माझ्या मरणाचं कळून ही न कळलेली…

१२.५६ AM
2 Dec 09

Advertisements

17 thoughts on “समजा मी उद्या मेलो”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s