शरीरांच्या कविता- कारणं

कारणं

शरीराला कारणं लागतात
justifications लागतात
ती परत वेगळी कळावी लागतात
खोलवर पोचावी लागतात

वेगवेगळी कारणं मिळत असली
की मजा येते, दोन्ही शरीरांना
मग त्रुटी लक्षात रहात नाहीत
सुख तेवढं पोचतं खोलवर

नको तिथे नको तेवढी
चरबी, मेद किंवा तत्सम काही
खरूज, फोड किंवा गळू
लपवण्यासाठी लागतात कारणं

शारीर सुखदुःखांपेक्षा
अशारीर कारणं भावतात
सुख मिळत राहिल्याशी मतलब
दोघांनाही; थोडंसंही पुरतं

ओळख सवय कंटाळा
ही त्रयी तुटते
सुखासाठी सुखापुरत्या
मिलनाच्या सुखानं!?

१८ डिसेंबर ०९
११.०५ AM

यावर आपले मत नोंदवा