equilibrium

डिमांड सप्लायचे धक्के खात
बाकी शून्य कधीही न होणारा भागाकार करत
वाळवंटातल्या मृगजळासारखा किंवा
खचाखच भरलेल्या लोकलमधल्या विंडोसीटसारखा
जगणारा हा equilibrium

फार आदर्श जगणं असतं याचं
म्हणूनच तितकंच दुर्लभही असतं
तिला वाटतं,” हा का चिडला?”
त्याला वाटतं,” ही असं का बोलली मला?”
तिचं काहीतरी बोलणं आणि त्याचं उगाच रागवणं

म्हणजे बाकी शून्य कधीही न उरणारा भागाकार करत
जगणारा हा equilibrium

हा आदर्शच जगतोय अनादीकाळापासून
पण आमच्या जगण्याचं काय?
लावलेली लेबलं नाहीशी करायला जावं
तर त्या लेबलांप्रमाणेच वागावं लागतं
लेबलांप्रमाणे न वागावं तर
लेबलं लावणार्‍यांचं फावतं…

खचाखच भरलेल्या लोकलमधे दिड पायावर उभे
आणि खिडकीत वारा खात बसलेला equilibrium

“त्या”च्यावर विसंबून एक काम करावं
एका कामासाठी जणू आयुष्य पणाला लावावं
खडकाळ जमिनीला नांगरून, पेरणी करून
सुकलेले अंकुर आणि तडे गेलेली जमीन
मग शेतीवाडी विकून मुंबईत, झोपडी पुरात बुडावी.

संध्याकाळची भाकरी ज्यांच्यासाठी मृगजळ आहे
त्यांना कसला आलाय बोडक्याचा equilibrium

आल्हाद महाबळ
१२.१९ AM
२४ फेब्रुवारी २०१०

इक्विलिब्रियम

2 thoughts on “equilibrium”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s