गोदूची वाट

वाट बघतोय; गोदूची वाट. ही गोदू म्हणजे माझी प्रेयसी, माझं जीवनध्येय, माझं जगायचं अवघं कारण असं सगळं सगळं काही आहे. आणि हो, सांगायची गोष्ट अशी की ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत! माझी प्रेयसी माझं जीवनध्येय नाही आणि जीवनध्येय कारण नाही आणि vice versa.

पण काहीही असो, वाट बघणं काही सुटत नाही. तिन्हीमधे वाट कॉमन म्हणून तिन्हीचं संबोधन एकच… गोदू. ही गोदू, माझी प्रेयसी येत नाही कारण ती कोण, कुठली, कशी दिसते, कशी बोलते ह्याची कसलीच कल्पना मला नाही. वाट बघणं जरी कॉमन असलं डोक्यात प्रश्न या एकाच बाबतीत आहेत; प्रेयसीच्या. जे जे प्रेयस, जे जे उत्तम ते मला हवं असतं पण या बाबतीत प्रेयस म्हणजे नक्की काय याची व्याख्या व्हायचीये.

आता मी पडलो मुलखाचा आळशी. डोक्यात हे असले प्रश्न घेऊन वावरा आणि परत वाटही बघा… कसं जमावं? 🙂 त्यापेक्षा बाकी दोन, गोष्टी बर्‍या… जीवनध्येय म्हणजे एकदम भारदस्त वगैरे वाटतं. पण ते वाटण्यापुरतंच म्हणजे अगदी साध्या साध्या कामातसुद्धा एकदम मोठ्ठा फील वगैरे घेता येतो… काहीतरी विधायक करत असल्याचा. मग निदान पुढचे २-३ दिवसतरी काहीतरी करून दाखवल्याच्या अविर्भावात वावरता येतं. उगाच छाती अर्धा पाऊण इंच पुढे वगैरे काढून फिरता येतं. मग अशा मूडमधे परत प्रेयसीच्या विचार वगैरे करून वाट बघणं जमतं. मग अनेक मजेदार गोष्टीही होतात. “केस कापावेत का?”, “hairstyle बदलावी का?”, “कोणता शर्ट घालू?”, “शिट्‍, आज परफ्युम विसरलो!” हे असे सगळे विचार याच काळातले. मग अगदी मित्रा-मित्रांमधे सुद्धा शिव्या देताना क्षणभर अडखळायला होतं. Adult jokes सगळ्यांना forward करताना उगाच नको वाटतं.

पण जसा कसल्यातरी achievementचा मूड पुढचे २-३ दिवस टिकतो, तसं साधारणतः तेवढाच काळ हे वर्तन टिकतं… नंतर परत आहेच… ये रे माझ्या मागल्या…

वाट, वाट आणि वाट.

आल्हाद महाबळ
१ मार्च १०
१२.३९ दुपार
धुळवड

Advertisements

8 thoughts on “गोदूची वाट”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s