ओल्ड स्पाईस

पावसाळ्याला अजून अवकाश होता. पण ढग दाटून आले होते. दुपारी चार वाजताच साडेसात-आठाचा फील येत होता. माझी नुकतीच सकाळ झाली होती. पलिकडच्या खोलीत PC वर गाण्यांचा ढणढणाट आणि इकडे माझं शेव्हींग चाल्लं होतं. कुठूनतरी कॉफीचा वास आला… एस्प्रेसो. काल रात्रीची उतरवण्याचे प्रयत्न अजून चालू असावेत कुणाचेतरी. कॉफीचा वास सुद्धा कडूशार होता. कुणाचेतरी म्हणजे शेजारच्यांचेच… वारा तिकडूनच येत होता. खरंतर वातावरण असं मस्त होतं मी ओल्ड स्पाईसच्या सुगंधात ओल्या मातीचा गंध एक्स्पेक्ट करत होतो. आणि आला हा कडूशार कॉफीचा वास.

चेहर्‍यावर पाण्याचा हबका मारला. आता आफ्टरशेव्ह, परत ओल्ड स्पाईस! गॅसवर आल्यासोबत रेड लेबल उकळतोय. चहा आणि ओल्ड स्पाईस हे आणखीनच अवली कॉंबिनेशन! I love shuffle mode. black eyed peas वाल्या will.i.am च्या I like to move it नंतर थेट नूरजहान… ’लट उलझी’ गात. गालावर थापलेल्या लिटरभर ओल्ड स्पाईसचा अजून दरवळणारा सुवास, स्ट्रॉंग रेड लेबल आणि उलझलेली लट… मस्त. आत्ता दुपार असली म्हणून काय झालं, माझ्या मात्र दिवसाची सुरूवात आहे. मस्त झाली. लट सुलझेपर्यंत चहाही बरोब्बर संपला आणि मग गाणी बंदच केली. साला, हाच मूड कायम पाहीजे.

सालं उन पडलं पण… श्या! चालायचंच. आता फोनाफोनी, गडबडगोंधळ, हॉर्नचे आवाज… कंडक्टरचं ’तिकेट… इकडे कोणी बाकी आहे का?’ सगळे ठरलेले आवाज आणि पेट्रोलचे, घामाचे, कचर्‍याचे; त्यात एखाद्या दाक्षिणात्य बाईच्या खोबरेल्लाळलेल्या वेणीवरच्या लांबच लांब मोगराच काय तो थोडाफार नवीन. चालायचंच. ओल्ड स्पाईस, चहा, एस्प्रेसो सगळं उद्या आता… एस्प्रेसोचं माहीत नाही पण चहा तर नक्कीच.

पण उद्याही येतील का ढग दाटून? आज न आलेला ओल्या मातीचा गंध येईल का उद्या?

One thought on “ओल्ड स्पाईस”

  1. तुमची सकाळ मात्र झकास झाली होती बरं!! चालायचंच, रोज-रोज तेच “..तिकिट काढायचं कोणी राहिलंय का?” याची मला सुद्धा सवय आहेच! सकाळी रेड लेबलच्या चहात डिलक्स ब्रेड बुडवून खाऊन (बिगर तोंड धुता!) माझी सकाळ होते ८-३० वाजता, मग पटापट कॉलेजला जाण्यासाठी रेडी व्हावं, एखादेवेळी केसं लयचं टोचायला लागले की जिलेट व्हिक्टरचे सपासप दोन तीन वस्तरे मारावेत, (एखादेवेळी लागलं बी तरी तुरटी असतेच की!) अन मग १-२ मिनिटांचा अवधी असतांना बस गाठावी! (रोजच नशिबात नसते म्हणा!) असो…

    “आय लाईक टू मुव्ह इट, मुव्ह इट..” हे आपलं बी फेवरिट बरं का! 😉

    बाकी लेख अतिशय छान झालाय!

    असेच लेखन चालू ठेवा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s