04
मे
10

एक अंधारा खड्डा

दुरून उजेडाचं मुख वाटणार्‍या प्रचंड अंधार्‍या खड्ड्यात कधी पडलो कळलंच नाही. दाणकन्‌ आपटलो, उजव्या भुवईवर जखम झाली. एक प्रत्यक्ष आणि हवं असणारं, असे दोन भाग दिसायला लागले तेव्हापासून. पहीलंच पाऊल एका गिळगिळीत खड्ड्यात पडलं. एक हृदयाच्या ठोक्याचा आवाज झाला, तो आवाज परत कधीच आला नाही. खड्ड्यातून वर एक उजेडाचं मुख दिसत होतं. म्हणजे परत अंधारच… मग अंधारातच पुढे चालू लागलो, उजेड समजून. “इतनी शक्ती हमें दे ना दाता”, अंधारातून आवाज ऐकू आला डाव्या कानाला. पटकन वळून पाहीलं तर, दोन मुलांचा बाहुलीचे कपडे काढण्याचा खेळ चालू होता. प्रत्यक्षात हे आणि हवं असण्याच्या खिडकीत अंधार. खोट्याही उजेडाचं दुर्भिक्ष्य. कसल्या शक्तीची याचना चालू आहे ते कळलं, बाहुलीलाही… ती जिवंत झाली. होते नव्हते ते कपडे नीट करून एकाबरोबर निघून गेली. दुसर्‍याची टक्क कोरडी नजर माझ्यावर. हवं असण्याच्या खिडकीत, मुलगा बाहुलीवर… स्वतःचाच असा गुन्हेगार करून घेतल्यावर पुढे निघालो. नव्या अंधाराच्या दिशेने. न चाचपडता खंबीर चालत. मनात इच्छा एकच, अजून एका खड्ड्यात पाय पडावा, उजेडाच्या.
उजव्या भुवईवरच्या जखमेनं नको ते दाखवलंय, आता बास. उजेडात डोळे दिपले फक्त… चौकोन तसेच, थोडे अधिकच भगभगीत. हवं असण्याचा चौकोन रक्ताळलाय आणि भगभगीत वास्तव सहन होत नाही… चला परत तिमिराकडे, वास्तवाचं तेज असह्य होतंय. उजवी भुवई दुखतेय.
३ मे १०
Advertisements

3 Responses to “एक अंधारा खड्डा”


  1. 1 Maithili
    मे 10, 2010 येथे 11:14 म.उ.

    Khoop chaan lekh…!!! Kharech Sunder…!!
    I m here fr d frst time… chaan aahe tumcha blog…
    Aani kaay aikalat ho tumhi majhya baddal…??? ( Majhya baddal koni kahi bolaley he kalalya nantar majhe kaan Sashya sarakhe tavakaarale jaatat… 😉 ) Koni kaahi bolale ka…??? Karan me melawyaat khoop chamee disat hote ase vatatay mala…. 🙂


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,576 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

लोकप्रिय लेखन

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: