पंचहजारी मार

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार माझ्या ब्लॉगने पंचहजारी माराचा (म्हणजे हिट्सचा) टप्पा पार केला. माझ्या सर्व वाचकांचे याप्रसंगी मी मनापासून आभार मानतो.


माझा ब्लॉग काही अतिशय वाचकप्रिय वगैरे आहे अशातला भाग मुळीच नाही. हा माझा पूर्वीचा याहू ३६० वरचा ब्लॉग मी वर्डप्रेसवर हलवला, मराठी ब्लॉगिंग विश्वाशी ओळख झाली, बर्‍यापैकी लिहायला लागलो. तेव्हापासून साधारणतः ११ महिन्यात माझ्या या ब्लॉगने पंचहजारी माराचा टप्पा पार केला. यानिमित्ताने माझाच ब्लॉग परत एकदा नव्याकडून जुन्याकडे असा वाचत जात असताना एक विचित्र गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माझ्या या ब्लॉगचं नाव जरी ’आल्हादक प्रतिबिंब’ असलं तरी इथे पूर्णपणे आल्हादक, आनंददायी असं फारसं काही नाहीच! इतकंच नव्हे तर अगदी आत्ता आत्तपर्यंत माझ्या ब्लॉगचं डिझाईनही डार्क काळ्यावर पांढरं असं उलटं होतं!! असो. तरीही उगाच असं लिहायचं असं लिहायचं नाही अशी बंधनं घालून उपयोग नाही कारण मला ती पेलवणार नाहीत. कारण एखादी कल्पना कधी व कशी डोक्यात येईल, आणि तिच्यातून काय बाहेर पडेल या सगळ्यावर माझाच अजून कंट्रोल नाही. फक्त ही सगळी प्रक्रिया चालू असताना प्रचंड अस्वस्थ वाटत असतं हे मात्र खरं.
तर ह्या पंचहजारी माराच्या निमित्ताने ब्लॉगच्या आकडेवारीत तोंड खुपसल्यावर हाती लागलेले काही मुद्दे असे;

पाच हजारावर मार जरी पडून गेले असले तरी एकूण प्रतिक्रिया मात्र १५०हूनही कमी आहेत. प्रतिक्रिया आणि माराचा रेशो ३ टक्क्यांहूनही कमी.

गेल्या अकरा महिन्यात सर्वाधिक मार मार्च २०१० मधे, ७५४.

गेल्या अकरा महिन्यातील सर्वाधिक व्यस्त आठवडा २००९चा ५३वा, ३२७.

सर्वात जास्त मार बसलेलं आहे माझं होमपेज, म्हणजे बहुतांश वाचक खोलात न शिरता असेच पळून गेले. इतकं बोरींग लिहीतो मी? १७०० मार बसलाय स्वगृहाला आणि त्याखालोखाल, लोकलमधला भिकारी, १६७ मारांसह! सर्वात जास्त मार बसलेली कविता, समजा मी उद्या मेलो, १२५!!

ब्लॉगला बसलेल्या मारापैकी सर्वाधिक मराठीब्लॉगविश्वाहून आले होते. मराठीब्लॉगविश्वाचे आभार.

प्रत्येक ब्लॉगपोस्टमधील महत्वाचे शब्द मी टॅग्ज म्हणून टाकत असतो. त्याचाच परिणाम म्हणजे मराठीत छाती / मांड्या / पलंगावर / ओठ असं काहीबाही गूगललंत तर माझा ब्लॉग/ब्लॉगपोस्ट्स सर्च रिझल्ट्स मधे दिसू शकतो! गूगल वेबमास्टर जिंदाबाद.

गूगल वेबमास्टरच्या मते माझा ब्लॉग पूर्ण लोड व्हायला सरासरीने ४.४ सेकंद घेतो.

माझ्या ब्लॉगच्या आरेसेस फीडचे ७ गूगल सबस्क्रायबर्स आहेत.

क्लस्टरमॅप्सच्या सौजन्याने असं कळतंय की, भारत, अमेरिका, इंग्लंड या नेहमीच्या देशांशिवाय लाटविया, लक्झेंबर्ग, पाकिस्तान अश्या देशातूनही लोकं माझ्या ब्लॉगला मार देऊन गेली आहेत.

हुश्श!

कदाचित पाचहजारी माराचा हा टप्पा पूर्ण व्हायला अजूनही काही दिवस लागले असते. पण मधे ब्लॉगर मेळावा झाला तिथे सगळ्या ब्लॉगर्सशी ओळखी झाल्या. प्रवेश केल्याकेल्या कुलकर्णीकाकांनी नाव आल्हाद महाबळ सांगताच थोडंसं संशयाने पाहील्यासारखं वाटलं. पुढे देवेंद्र चुरी आणि कांचन कराई भेटले. दोघांच्याही मते मी इतका तरूण किंवा लहान असेल असं वाटलंच नव्हतं. दोघांनी ही आपापल्या वृत्तांतात अगदी आवर्जून उल्लेख केला!!!!! अर्थात, मी नक्की खूप मॅच्युअर्ड वगैरे लिहीतो की मी विचाराने जख्ख म्हातारा हे अजून कळायचंय मला. आपणांस कळलं तर नक्की सांगा.

पंचहजारी माराबद्दल परत एकदा धन्यवाद.

कळावे, लोभ असावा.

आल्हाद महाबळ.

Advertisements

9 thoughts on “पंचहजारी मार”

  1. पंचहजारी माराबद्दल पंचहजारी अभिनंदन, आल्हाद 🙂

    उत्तरोत्तर असाच मार तुझ्या ब्लॉगला पडत रहो अशा पंचलक्षी शुभेच्छा !!!

  2. अभिनंदन…मलाही आधी खुप कमी प्रतिक्रिया मिळायच्या पण आता माझ्यासाठी काही लोक प्रतिक्रिया लिहायचा त्रास घेउ लागले आहेत…बाकी मेळाव्यात खरच धक्का बसला होता मला…जमल्यास पांढरशुभ्र सफ़ेद भडक अस आल्हाददायक ही लिहा कधी…ब्लॉगच्या पुढील वाटचालीसाठी अगदि मनापासुन शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s