तुझी आठवण

ते नाजूकसे उंच टाचांचे सॅंडल्स
दाराशी
लांब लांब केसांचा गुंतवळा
डस्टबीनशी
अनेक चित्रविचित्र हेअरक्लिप्स
आरशासमोर
नीट आवरलेला, स्वच्छ, न सुरकुतलेल्या बेडशीटचा
पलंग
सासूसुनांच्या सिरीयलवाला, एल्सीडीचा लेटेस्ट टिव्ही
बंद
आणि काल रात्रीच्या शिळ्याचा भरलेला फ्रिज
थंड
छान धुवून, निवडून, चिरून अन्‌ झाकून ठेवलेली
भाजी
तीन शिट्ट्या मारून दम खात बसलेला, हाश्‌ हुश्‌
प्रेशर कुकर
आणि ह्या सगळ्यात बसलेला मी
एकटा तुझी वाट बघत
“अगं ये ना लवकर, किती वेळ लावतेस आंघोळीला…”
टक्‌ टक्‌
मला बघायचंय तुला… … …
… तसं!
ये लवकर
आल्हाद महाबळ
१२.३८ दुपार
२७ जुलै १०

8 thoughts on “तुझी आठवण”

यावर आपले मत नोंदवा