मानसीचा चित्रकार तो…

अमावस्येच्या रात्रीचा गडद अंधार, लाल शेंदरी पहाट, आणि आता कोवळं ऊन झरोक्यातून आत येऊ लागलं. त्या ताज्यातवान्या उन्हानं खोली उजळून निघाली होती. कवडश्यात धूळ खेळत होती. मधूनच हवेच्या झुळकीने गडबडून जात होती.
त्याचं कशातच लक्ष नव्हतं. त्याचे हात वेगाने त्याच्या कॅनव्हासवरून फिरत होते. वेगवेगळे रंग, वेगवेगळे ब्रशेस, काहीच नसेल तर हाताची बोटं सगळं वापरून होत होतं, तरीही अपूर्णच त्या चित्रावरून त्याची नजर हटत नव्हती. आख्खी बादलीभर रंग तयार करून तो बादलीभर रंग तयार करून तो बादलीभर रंग कॅनव्हासवर ओतून वॉश देण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. स्वतःशीच हसून त्यानं ती दुसर्‍याच क्षणी सोडून दिली. Abstracts मधे त्याचा हातखंडा. Abstracts करताना तो आजवर कधीच असा अडखळला नव्हता. पण साला तिचा तो wildness आणायचा कसा चित्रात? रानटीपणा नाहीये तो, wild हाच बरोबर शब्द आहे असं त्याला वाटायचं. त्याच्या दृष्टीने तो स्वतः फक्त धसमुसळा होता, तिच्या दृष्टीने रानटी. त्याचा स्वतःचा रानटीपणा नाहीच, त्याला त्यानंच तिला दिलेलं wild हे विशेषण दाखवता येत नव्हतं. खूप प्रयत्न करून पाहीले. खूप वेगवेगळे प्रकार केले. यश नाही. तो थकून मागच्या टेबलावर रेलला. दोन चार ब्रश घरंगळ्त इकडे तिकडे गेले. रंगांच्या बाटल्यांमधे अजूनच दाटीवाटी आली. त्याची नजर निश्चल… त्या चित्रावर. त्यालाही आता ते अपूर्ण abstract, सर्वसामान्यांसारखंच रंगांच्या शिंतोड्यापलिकडलं काही वाटत नव्हतं.
त्याच्या त्या धूळभरल्या चित्रकारी साम्राज्याच्या पलिकडे अजून एक साम्राज्य होतं; शांत, सुंदर, नितळ, स्वच्छ आणि तेजस्वी. तिथल्या झरोक्याला दुधी काच होती लावलेली. कधी काळी त्यानंच रंगवलेली. अन्‌ आता त्या काचेतून रंगाची उधळण होत होती, तिच्यावर. त्याच्या साम्राज्यातला कोवळा पिवळा रंग तिथे लाल, निळा, आकाशी तर कधी पांढराशुभ्र होऊन येत होता. त्या रंगांचे अद्‌भूत खेळ पहात होती ती. तिच्या अंगोपांगांवरच तर खेळत होते ते प्रफुल्लित रंग. त्यातून गाळून येणारा उष्ण सूर्यप्रकाश… उष्ण!
तो जवळ आला की आधी घट्ट मिठी मारायचा; मग त्याचे डोळे दिसत, उष्ण. मग सावकाश त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ येत; मग एक थरथर जाणवे, उष्ण. आदल्या रात्री फारसं काहीच बोलणं झालं नव्हतं त्यांच्यात. खरंतर तो खूप बोले तिच्याशी. अनेकदा असंबंध तरीही अर्थपूर्ण. त्याने तिला एकदा सांगितलं होतं की पाण्यासाठी तो निळसर वॉश कधीच वापरत नाही ते… लहानपणी त्यांच्याकडल्या फिशटॅंकमधे, नवीन आणलेल्या मोठ्या माशानं छोट्या माशाला खाण्याआधीचं जीवचं युद्ध त्याने पाहीलं होतं. खरंतर एकट्यानेच. तोवर पारदर्शक असणार्‍या पाण्यात हलकासा लाल रंग मिसळत राहीला होता कितीतरी वेळ. आणि सिंकच्या गळक्या नळाचा टपटप आवाज त्याला खूप वेळ छळत राहीला होता नंतर… त्याच्या उघड्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात तिला हे सगळं आठवत होतं. मग रात्रभर तिच्या कुशीत तो नव्याने खोल खोल शिरत राहीला होता. अनेकदा तिची नखंही रुतत जात होती त्याच्या पाठीत, दंडावर, हातावर…
तिची लांबसडक बोटं, गुलाबीसर नखं, ते नाजूक हात, एक निमग्न शांत हसरा चेहरा आणि नखांना लागलेलं रक्त; दिसेल न दिसेलसं. त्याच्या तडफडीचं उत्तर त्याला सापडलं. खरंतर त्याच्या इतक्या वैयक्तिक सुस्पष्ट तरीही प्रेमळ अनुभूतीचं, त्या आवेगाचं abstract करणं कसं जमणार होतं त्याला? कधीच नाही! त्या आनंदात त्याने हिरवा घेतला आणि अक्षरशः कॅनव्हासवर फेकून मारला. मातकट अवकाशात हिरवा ओघळ… वैराण जमिनीवर हिरवाईचा पाऊस पाडण्याची चित्रकाराची मनीषा असण्याचं interpretation काही करणारही असतील पण त्याची त्याला आता पर्वा नव्हती.
तो वॉश घ्यायला निघाला. ते चित्र पूर्णांशाने तिच्या समोर आलं. ती चमकली. ओढलं गेल्यासारखी ती त्याच्यामागे गेली. तिच्या अंगावरून चादर सळसळत गेली, मागे राहीली. ती पुढे गेली. त्याच्या मनातलं न्यूड नव्याने आकार घेत होतं. तो चेहरा धूत होता. हातावरचा रंग मन लावून काढत होता. ती मागून येऊन घट्ट बिलगली त्याला. तो मागे वळला. साबणभरल्या ओंजळीत चेहरा घेतला. कपाळावर हलकेच ओठ टेकले. क्षणभरात दोघंही एकमेकांच्या घट्ट मिठीत होते, त्याचे साबणभरले हात आता तिच्या नितळ पाठीलाही रंगवत होते, आरसा थोडा धुरकटला होता, ऊन तापत होतं, रंग जळत होते, भान हरपत होतं.
दृष्य धूसर होत गेलं…
११.१० PM
१३ ऑगस्ट १०
Advertisements

8 thoughts on “मानसीचा चित्रकार तो…”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s