प्रजासत्ताक

अजून एक गाडी धूळ उडवत भरधाव गेली
पांढरी अ‍ॅम्बेसिडर, बघितलं तरी विटाळ व्हावा अशी
जुन्या पेपरच्या तुकड्यावर, दोन पाव आणि कटींग चहाचं जेवण
चवीसाठी उडवून गेली गाडी, प्रजासत्ताकाची माती.
मातीची कचकच दाताखाली सवयीचीच तशीही
आता तिला चव, भूकबळी, नरबळी, बलात्कार आणि ऑनर किलिंग्जच्या रक्ताची
प्रजासत्ताकाची चव ही अशीच, थोडी तिखट, तुरट आणि कडू तर खूपच

नाक्यावरची नेहमीची चार कुत्री भांडत होती, एका नवीन कुत्रीसाठी
ती मजा बघत होती, लाळ गाळत…
गळणार्‍या लाळेवरूनच कळत होती, तिला होत असलेली संगाची अनावर इच्छा
मालकाचा पट्टा सोडवून एक धट्टाकट्टा श्रीमंती कुत्रा आला
गांडीला नाक लावून वास घेऊ लागला, कुत्रीचं पाणी ओळखलं त्यानं लगेच
प्रजासत्ताकही हरतोच कुठेतरी, नवनवीन हायब्रीड जमाती जन्माला घालायला

बाकी दाताखाली कचकच येवो
किंवा गोट्या अडको… … …
दगडांचा मारा तर सुटत नाहीच.

१२.२२ AM
८ सप्टें १०
आल्हाद महाबळ

Advertisements

3 thoughts on “प्रजासत्ताक”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s