एका जगण्यानंतरही

एका जगण्यानंतरही
मेलेला जागा झाला
होत्याचे नव्हते झाले
जणू काळ जागी थांबला
मनोहर त्या दृष्यावरती
नजर पडे मेलेली
गालावरचा अश्रू दुःखी
पडावयाचा राहीला
चाखून बघता रसनेवरती
ओळखीचा तो वाटला
जीवनाचे जिच्या कर्ज त्याला
त्याच्या विधवेचा तो होता
मेलेल्या न थांबविती
काळ काम वेगाची गणिते
त्याच्या पाऊलखुणांवरती आता
सरणजाळ गरम पेटला
गलितगात्र स्वघरदारी
पाऊल पडता त्याचे
सरणजाळ तो तडतडता
वाटेतच थांबून गेला
मऊसूत दुपट्यामध्ये
मांसाचा तो गोळा
टुकूटुकू पाहे जगी
अंधारी गोंधळे बिचारा
मेलेले ते बोट
तीट लावे गाली
बाळ तो नाजूक अन्‌
हसत गोड झोपला… झोपला
सरणावर त्वचेचे जळणे काळे
तीचे मुसमुसणे भयाण वाटे
पापी मरणापुढती त्या
बाप हृदयी जळला… जळला… जळला…
आल्हाद महाबळ
६/१०/१०
५.२१ PM

One thought on “एका जगण्यानंतरही”

यावर आपले मत नोंदवा