गाडीची सर्व्हिसिंग ड्यू आहे…

एका रात्री झोपच येईना
गार एसीत, मऊ मऊ गादीवर, प्रेमळ बायकोसोबत
झोपच येईना
गुडूप अंधारात टक्क उघडे डोळे
फारच कंटाळा आला तसा उठून गॅलरीत आलो
माझी कार खाली स्ट्रीटलाईटमधे न्हाऊन निघत होती
विचित्र सावलीमुळे चाकं उगाचच महाकाय वगैरे वाटत होती
तुळस झोपली होती निवांत…
जागा फक्त मी होतो
अचानक माझ्या कार भोवती जळमटं उगवावीत
तशा चारी बाजूंनी झोपड्या उगवल्या
कोळ्याच्या नाहीत, हाडामांसाच्या माणसांच्या
पोरगं स्टीअरिंग व्हीलचं चाक करून पळवू लागला…
पेट्रोलवर स्टोव्ह पेटला…
नवरे लोखंड तोडून विकू लागले…
म्हातार्‍यांनी सीटवर झोपा काढल्या…
मी इथे सगळ्या सुखात असूनही टक्क जागा
अनाहुतपणे तुळशीवरून बोटं फिरवली
तशी करपलीच ती…
धावत बेडरूममधे गेलो…………
.
.
नाही, नुस्ता विचारच केला तसा
बेडरूमपर्यंत पोचलोच कुठे?
.
.
सकाळी असा दरवाज्याशी का झोपलो हे सांगता येत नव्हतं
आणि बायकोचं गमतीत निर्वासित म्हणून चिडवणं सहन होत नव्हतं………………………
.
.
.
.
.
“गाडीची सर्व्हिसिंग ड्यू आहे…”
आल्हाद महाबळ
१२.५३ रात्र
१३ ऑक्टोबर २०१०
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s