22
नोव्हेंबर
10

ती मीनाकुमारी

अर्धबंद डोळे आणि गच्चबंद ओठ इतकंच दिसलं मला तिच्याकडे पहिल्यांदा पहाताना. कार्यक्रम चालू होता. सगळे बोलत होते. आपपली मतं हिरीरीनं मांडत होते. ती बसली होती फक्त. शांत म्हणता येणार नाही पण गप्प. काळ्याभोर डोळ्यांनी बोलणार्‍याकडे टक लावून पहात बसे. एखादा महत्वाचा मुद्दा आलाच तर दादेखातर तिचे डोळे जमीन बघत आणि कुठेतरी हरवून जात. रोखून बघणारे ते डोळे भावशून्य वाटावेत इतके स्थिर होते. कसल्यातरी अनाम निष्कर्षाप्रत आलेल्या भासणार्‍या त्या डोळ्यात डोळे घालून बघणं अवघड. का अवघड? थेट बघतात म्हणून की कसलेतरी प्रश्न विचारतील म्हणून? निव्वळ डोळेच नाहीत तर ओठही तिच्या गप्पपणात सामील. ना एक सुरकुती, ना आठी, खूप काळ दूर राहून एकत्र आलेल्या प्रेमिकांगत घट्ट एकमेकांत. त्या ओठांचा भूतकाळ काय असेल? त्या डोळ्यांनी इथे येण्याआधी काय पाहीलं असेल? की ते ओठ असे गप्प झाले आणि डोळे रोखले गेले जगावर. पण हेही नुसतंच आहे तिचं. ना ओठात काही दुःख ना डोळ्यात काही प्रश्न. मग? तिला उत्तरं मिळालीत सगळी? अस्तित्वाचे ओरखडे पाडूनच घ्यायचे नाहीत असं ठरवलंय का तीने?

नंतर मित्र म्हणतो ती कविता करते. कविता? काय असतील तिच्या कविता? माळरानावरच्या निरव शांततेवर की आपल्याच लांबसडक केसांखाली चेहरा लपवून रडणं? की तिला कधी अश्रू आलेच नसतील? ती निवांततेवर कविता करेल की ती सन्नाट्यावरची असेल? की उगाच जग भुलवायला, उच्छृंखल प्रेम वगैरे? जगाला हवं ते वाटून टाकून स्वतःचा अलूफनेस जपत्येय ती. ती जगायला कंटाळलेली नक्कीच नाही. ती आयुष्य लिहीत्येय, छंदबद्ध करत्येय. गेला उच्छवास विसरून हृदयाचा नवा ठोका ऐकतेय.

ती कशी बोलेल? तिला नेलपेंटची कुठली शेड आवडत असेल? तीने एकही प्रश्न न विचारता इतके प्रश्न पडत असतील मला तर म्हणजे हद्द आहे. का प्रश्न पडले मला? मला तिच्या डोळ्यात कारुण्य बघायचंच होतं. मला त्या अबलेची दुःखद कहाणी जाणून घेऊन तिला खुल्या दिलाने मदत वगैरे करायचा आव आणायचा होता. तिच्या ओठात प्रश्न असावेत असं मला वाटतं होतं कारण मला त्यांना आदर्शवादी उत्तरं देता आली असती… ह्म्म्म विचार करावा लागणार आहे. कारणमीमांसा का सिंहावलोकन का काय ते ही करावं लागणार आहे.

मग मी मांडलेल्या मुद्द्यावर तिचे डोळे परत एकदा जमीन बघतील आणि मी मुद्दा पूर्ण करेन, मैफल जिंकताना!

Advertisements

1 Response to “ती मीनाकुमारी”



प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,576 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

लोकप्रिय लेखन

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: