ब्राह्मणी प्रेम!

गरम फुलक्यावर ओघळणार्‍या तुपासारखं
मऊसूत करून जातेस जगणं
पिवळ्याधमक साध्या वरणातल्या तूपथेंबासारखं
चमकत रहातेस… वरण कितीही ढवळलं तरी…
बोटं तुपानं बरबटवत फुलक्याच्या घास
वरणात बुडवून घ्यावा आणि हरवून जावं
आल्या चवीच्या आठवणीत क्षण दोन क्षण…

असं जेवण संपत नाही तोवर
केळ्याच्या शिकरणीची दुधाळ ओढ वाट पहात असतेच…

 

१:३८ दुपार
१३ एप्रिल ११

 

3 thoughts on “ब्राह्मणी प्रेम!”

यावर आपले मत नोंदवा