दशहजारी मार

१५ मे २०१० नंतर आज १४ एप्रिल २०११ रोजी म्हणजे साधारणतः ११ महिन्यांत माझ्या ब्लॉगने ५ हजारापासून दुपटीचा म्हणजे १० हजाराचा टप्पा पार केला. ११ महिने आणि माझं काहीतरी साटंलोटं असावं बहुतेक! माझ्या ब्लॉगापेक्षा दसपटीने जास्त वाचक असणारे अनेक ब्लॉग्ज इथे असतानाही माझ्या ब्लॉगलासुद्धा इतके वाचक लाभावेत याचा आनंद आहे. ११ महिन्यात ५ हजाराचा नवा मार मिळाला म्हणजेच दर महिन्याला ४५४.५५ आणि दर दिवशी फक्त १५.१५ इतकाच सरासरी मार. विशेषतः गेल्या वर्षभराच्या काळात ब्लॉगविश्व आणि त्यातील माझ्या ब्लॉगचं फारसं वाचकप्रिय नसणं हे जाणवल्यानंतर अशा स्टॅटिस्टिक्स खोदून काढताना वेगळीच मजा वाटतेय.
पंचहजारी माराच्या वेळेस ब्लॉगर मेळावा आणि या वेळेस माझी ‘ब्राह्मणी प्रेम‘ ही कविता ह्यांनी माझ्या ब्लॉगला कमी दिवसात जास्त (म्हणजे फक्त सरासरीपेक्षा!) वाचक मिळवून देण्याचं काम केलं. त्यांचे धन्यवाद. नेमानं रोज आणि तरीही चांगलं ब्लॉगिंग करणार्‍यांचं लिखाण मी वाचत असतोच पण माझं स्वतःच ब्लॉगिंग महिन्याला २-३ पोस्ट्स च्या वर फार कमी वेळा जातं. पण अर्धमृतावस्थेतले ब्लॉग्जही इतके झालेत की आळशी ब्लॉगर म्हणून माझं नामांकनसुद्धा होणार नाही. महिन्याला सर्वात जास्त ७ पोस्ट्सचा विक्रम मी डिसेंबर २००९ मधे केला होता. त्याचं श्रेय शरीरांच्या कविता ही पाच कवितांची मालिका आणि इतर दोन पोस्ट्सला जातं. त्याखालोखाल जानेवारी २०१० आणि मार्च २०११ या दोन महिन्यात ४ ४ पोस्ट्स लिहीण्याचे अतिश्रम मी केले. माझ्या या आळशी स्वभावास अनुसरून वाचकही मला प्रतिक्रिया द्यायचे कष्ट घेत नाहीत. नव्या पाच हजार मारामागे मला फक्त पन्नासेक प्रतिक्रिया मिळाल्या. तस्मात्‌, हिट्स आणि प्रतिक्रियांचा रेशो फक्त २ टक्क्याच्या आसपास घुटमळतोय. रच्याकने, वर्डप्रेसच्या अकिस्मेत सेवेने तब्बल ३६३ स्पॅम कमेंट्स अडवल्यात! माझं बोरींग लिहीणं चालूच आहे. एकूण वाचकांपैकी तब्बल चाळीस टक्के जण होमपेजवरूनच पळून गेले. पंचहजारी मारवेळेची हाय स्कोरर समजा मी उद्या मेलो ही कविता आता मागे पडली असून शरीरांच्या कविता मालिकेतल्या अनर्थ या कवितेनं ३४५ मारासह पहिला क्रमांक पटकवला आहे. गद्य लिखाणात अजूनही लोकलमधला भिकारी हे माझं अनुभवकथनच १९७ मारासह आघाडीवर आहे. फक्त मागच्या वर्षभराचा वचार करायचा झाल्यासही अनर्थच आधी येतो! गद्य लिखाणात त्या मानसीचा चित्रकारानं १५२ मारासह बाजी मारली. माझ्या ब्लॉगवरून माझ्या Alhad M Photography या फेसबुक पेजच्या बॅजवर २४ वेळा क्लिक झालं. त्या खालोखाल क्लस्टरमॅप्सवरील माझ्या व्हिजीटर्सचा मॅप २१ वेळा बघण्यात आला. याच क्लस्टरमॅप्सच्या सौजन्यानं असं कळतं की माझ्या ब्लॉगवर १ इराणी, १ इक्वेडोरीयन आणि १ प्युर्टोरिकनही वाट चुकून गेला आहे! त्यांचे त्यांच्या त्यांच्या भाषांमधून धन्यवाद.
माझ्या ब्लॉगचे आता १३ गूगल सबस्क्रायबर्स आहेत. धन्यवाद!
माझ्या दशहजारी मारापैकी साधारणतः २५% मार आणून देणार्‍या मराठी ब्लॉग्ज डॉट नेटचे तर आभारच आभार.
धन्यवाद.

Advertisements

5 thoughts on “दशहजारी मार”

  1. मला आवडला बुवा तुमचा ब्लॉग! ही पोस्टही आवडली.तुमचा सगळा ब्लॉग तुम्ही यात उभा केलाय!:)तुमची शैली तर खूपच आवडली.अगदी मनापासून सांगतोय.राहता रहिलं सतत लिहिणं.तुमचा लेखनाचा वेग जरा वाढवा ही प्रेमाची विनंती!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s