डोकेदुखी- २

अजून ३०-३५ नमस्कार घालून झाले त्याचे. पावडरला न जुमानता तो प्रचंड घामेजला. बसला जरा तसाच टेकून पलंगाला. बनियननी घाम पुसला. बनियन फेकून दिला दूर मग. त्याच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे त्याला त्याचा लॉंग वीकेंड मिळाला होता. जवळपास तीन महिन्यांनी आज तो निवांत घरी होता. तोही जागा. टिमलीडर झाल्यापासून टीमलीडर हा प्राणी प्रॉग्रॅमर्स, डेडलाईन्स आणि बॉसेस ह्यांच्या तिहेरी सॅंडवीचमधली चटणी असतो हे ज्ञान नव्याने झालं होतं. तो उद्वेगाने अजून नमस्कार घालायला सरसावला पण त्याच्या हातांनी आता पार असहकारच पुकारला. तेव्हा फोन वाजला. तिचा होता. त्याच्या तिचा… त्याने थरथरत्या हाताने फोन घेतला. खूप वेळ ती काहीच बोलली नाही. तिचे जड श्वास जाणवत होते. त्यानेही मग परत हॅलो हॅलो केलं नाही. काही मिनीटांनी ती बोलती झाली. मुलाकडच्यांचा होकार आल्याचं सांगितलं. आवाज खोल गेला होता तिचा. “त्याला नाही म्हणायला काय कारण देऊ रे?” या तिच्या प्रश्नावर तो फाफललाच. विशेषतः त्या रे मधल्या हेलकाव्यानं. तो काही बोलायला जाणार इतक्यात फोन ठेवूनच दिला तिने. लगोलग एसेमेस (ती इतके पटकन् मेसेज कसे टाईपते हा त्याचा एक अनुत्तरीत प्रश्न होता!) तिला होकार दिलेल्या त्याचा फोन आला असल्याचा. ह्याच्या डोक्यात वादळ. आता ती त्याला काय उत्तर देणार? ह्या वादळातून बाहेर पडणं गरजेचं होतं. उद्यापासून परत कामावर जायचं होतं.

त्यानं त्याच्या सबॉर्डिनेटला फोन लावला. टिव्हीसी उर्फ टिव्ही कमर्शियल. खरंतर तिचा हुद्दा टिम व्हाईस कॅप्टन असा होता. म्हणून टिव्हीसी. मग तिच्या स्वभावाला उद्देशून कुणीतरी टिव्ही कमर्शियल म्हणून टॉंट मारला. आणि तेच नाव पडलं तिचं. ती तिकडून हॅलो हॅलो करत होती आणि हा तिचं नाव आठवत बसला होता. वैतागून दोघांनीही फोन कट केला. हा फोन बाजूला ठेवत नाही तोवर टिव्हीसीचा एसेमेस, “वॉट यू डुईंग?” असा. “अरे काय स्पीड आहे का काय?” फोन पलंगावर फेकून तो निघून गेला.

“यू ओके ड्युड?” टिव्हीसी
“याह. आय ऍम… फ्रेश ऍक्चुअली. बॅक विथ न्यू व्हिगर” तो
“यू डोन्ट लूक लाईक सो.” एवढं बोलून टिव्हीसी निघून गेली.
“टिव्हीसी…” त्याने हाक मारली तशी आजूबाजूच्या दोन क्युबिकल्स मधे खसखस पिकली.
“यू टू?” टिव्हीसी
“याह. मी टू. व्हॉट्स युअर नेम? आय फरगॉट.” तो
“हूं. डोन्ट किड मी” टिव्हीसी आली त्यापेक्षा दुप्पट वेगाने रेस्टरूमकडे निघून गेली.


“टिव्हीसी? अरे तू बरायस ना?? टिप्पीकल फाल्तू प्रेमत्रिकोण वगैरे दाखवणारेस आता?”
“ओ म्याडम, लिवलंय त्येवडं वाचा आन् सांगा काय त्ये. फुडचे परश्न माह्या डोक्यानं न्हाय इच्यारले आजून…-”
“कळलं कळलं.”
“हं”
“ए मला सांग, – तुला माझा बॉस तर माहितीचे.”
“हां तर?”
“समजा. समजा हं… त्याच्या शेकेट्रीचं…. उंऽऽऽऽ सेक्रेटरीचं”
“हाहाहाहा”
“ऐक रे. समजा माझ्या बॉसच्या सेक्रेटरीचं लग्न झालं. आणि तिच्या लग्नाचं आमंत्रण असूनही बॉस लग्नाला गेला नाही. आणि दारू पीत बसला. तर तू काय म्हणशील यावर?”
“इंटरेस्टींग! काय लफडं बिफडं हाय काय?”
“नोप्स. जस्ट टेक फॉर्वर्ड युअर थिअरी. यू मे बिल्ड अ स्टोरी अराउंड!”
“तुझा बॉस आहे ना, तो जेव्हा त्याच्या सेक्रेटरीला डिक्टेशन देतो ना, तेव्हा तो टेबलवर बसतो. लुकींग डाऊन टू हर.”
“लुकींग डाऊन… टेबलवरून… खुर्चीवर बसलेल्या तिच्याकडे.?! नालायक पुरूष आहेस तू.”
“ऍण्ड यू एन्जॉय दॅट, राईट?”
“या. आय डू!”
“बॅक टू द पॉईंट. तो जेव्हा काही डिक्टेट करतो किंवा अपॉईंटमेंट्स, कॉरसपॉंडंसचं ऐकत असतो तेव्हा त्याला आठवत असतं त्याचं बालपण… बॉस पन्नाशीचा तरी असेल ना?”
“हं कॅन से.”
“सो तो ना तिचं बालपण फॅंटसाईज करतो. त्याला त्याची दहावीतली मैत्रीण आठवते. सेक्रेटरीची जिवणी तिच्याचसारखी नाजूक वाटते त्याला. सो असं… त्याची जी मैत्रीण असते. ती नाजूक जिवणीवाली. तिचं ना एकदा काय होतं. तिच्या शर्टाचं पहिलं बटण तुटतं. तो टिपीकल शर्ट-स्कर्टचा युनिफॉर्म… त्या दिवशी… त्या दिवशी तो तिला पहातो ना. त्याचं लक्ष- साहजिक आहे ना -तिच्या छातीकडे जातं. आयुष्यात पहिल्यांदा. आयुष्यात पहिल्यांदा त्याला तिची छाती गुंगवून ठेवते. तो दिवसभर तिच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. तिला कसलीच कल्पना नसते. दुसर्‍या दिवशी बटण अर्थातच परत जागेवर असतंच. तेव्हा परत त्याचं लक्ष जिवणीवर जातं. ती हसून हाय म्हणते. पण ती जिवणी त्याला नाजूक वगैरे वाटत नाही. त्या दिवसानंतर कधीच नाही. पुढे तिच्याशी कॉन्टॅक्ट तुटतो. तो लग्न करतो. संसार करतो. सगळं छान. पण तो नाजूकपणा आणि डोळ्यातली निरागसता तो हरवतोच… तेच शोधतोय तो…”
“—”
“आय थिंक यू नो व्हॉट आय मीन…”
“याह बेबी. आय लव्ह यू.”

(क्रमशः)

Advertisements

5 thoughts on “डोकेदुखी- २”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s