डोकेदुखी- ३

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २ 

त्याच्या डोक्यातला इफ- एन्डिफचा लूप संपतच नव्हता. नवीन प्रोजेक्ट डेडलाईन्स आणि टेस्टर्सचे असल्यानसल्या बग्जचे रिपोर्ट्स असं सगळं तो एकत्रच वाचत बसला. आणि डोक्यात लूप. एखादा अरेंज मॅरेज करणारा पुरूष काय बोलतो? तो काय बोलेल? ती त्याला आवडणं स्वतःच्या आईवडलांच्या तोंडून तिच्या आईवडलांच्या कानावर घालून तिच्यापर्यंत पोचवल्यावर? ते काय कन्व्हिक्शनने बोलतील? ती काय कारण देईल? ती कारण देईल? ती का कारण देईल? तो लवकरच पुन्हा एकदा जर तरच्या जंगलात शिरणार असल्याची जाणीव त्याला झाली आणि तो कॉफी प्यायला पॅन्ट्रीत पळाला. गेले काही दिवस भरपगारी सुट्टीवर घरीच होता म्हणून धकलं सगळं. आता हापिसात कामात लक्ष घालणं भाग होतं. पुन्हा ती डोकेदुखीची आवर्तनं त्याला नको होती.
संध्याकाळी टिम मीट नंतर टिव्हीसीने ती लग्न करणार असल्याची ऑफिशियल घोषणा करून टाकली. जात, पत्रिका, घराणं, शिक्षण अशा निकषांवर अनुरूप असा मुलगा टिव्हीसीच्या पालकांनी तिच्यासाठी शोधून काढला होता. आणि ती त्याच्याशी लग्न करून अमेरीकेत जाणार होती. अर्थात्‌, ही अनॉफिशियल घोषणा आधीच झाली होती. त्यामुळे आज वर्षानुवर्ष मरमर करून परदेशी ऑनसाईट न जायला मिळालेल्या आमच्या बॉसेसच्या चेहर्‍यावरून जेलसी नुसती निथळत होती… चालायचंच. आतातरी तिला नावानेच हाक मारायची असं ठरवून तो डेस्कशी परतला.

“हे मिस. सिक्वीरा”
“आय थिंक यू हॅड फरगॉटन माय नेम राईट?”
“या. बट बॉस कॉल्ड यू बाय नेम सो… ऍन बाय द वे… व्हॉट इंग्लिश यू स्पिकींग?? हॅड फरगॉटन?? नोवन अंडरस्टॅंड्स धिस काईंडा इंग्लिश इन अमॅरिका यू नो!”
“आय नो रे बाबा. बट ही इज टोट्टल मल्लू. हॅजन्ट चेन्ज्ड इव्हन आफ्टर स्टेईंग इन अमेरिका फॉर हाफ ऑफ हिज लाईफ… ही स्टिल स्पीक्स प्युअर क्वीन्स इंग्लिश इन प्युअरेस्ट ऑफ मल्लू ऍसेंट…”
“व्होआ!”
“एव्हरी नाईट ही मसाजेस हिज ओन हेड विथ पॅराशूट… एव्हरी नाईट!”
“नाऊ यू डोंट किड मी ओके…”
“इट्स द अरेंज्ड मॅरेज ड्युड. हॅज इट्स ओन टाईप ऑफ फन!”


आंबेमोहोर भात चिंचगुळाच्या आमटीशी खाऊन झाला. मोअरमधून आणलेला भात म्हणून आंबेमोअर भात असा जोकही सोबतीला चावून झाला. आवरासावर, सगळी झाकपाक झाली. आणि दोघं आडवे झाले. आजकाल पलंगावर पडल्यापडल्या अंधारात नजर लावून गप्पा मारत एकमेकांशी. भरपूर.
“ए, ऐक ना”
“बोल”
“—”
“बोल ना रे”
“ए सॅडिस्टी… छातीवरचे केस कसले उपटतेस?”
“हाहाहा”
“मी करू का असं?”
“माझ्या छातीवर केस नाहीयेत.”
“हं… असो. ए तुला आठवतो तो माझा रूममेट? त्याने लग्न केलं.”
“काय? कधी? काहीच बोलला नाहीस तू?”
“आज संध्याकाळीच फोन आला त्याचा. मुलगी बघायला म्हणून गावी गेला. आणि सायबा लग्न करूनच परततोय आता.”
“हे ग्रेटच! भारीच आवडलेली दिसतेय मुलगी.”
“हो… सांगत होता तेच. खूप सुंदर आहे म्हणे. हुशार, सुशील वगैरे… आणि खरी ग्रेट गोष्ट ही की तो ही तिला तितकाच आवडला! ए मला सांग, म्हणजे हे लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?”
“गुड क्वेश्चन!”
“हं”
“चल झोपते मी.”
“के”
“आणि नो चिमटे हां…”
“नाही गं.”

काही क्षणांसाठी त्याच्या ओठांत ओठ गुंतवले आणि मग त्याच्या कुशीत शिरून झोपून गेली. गाढ क्षणार्धात. अगदी अभावितपणे त्याचा हात तिच्या पोटाशी गेला. तिला अजून स्वतःकडे ओढून घेत तो ही झोपून गेला.


लॉंग वीकेंडनंतरचा पहिला दिवस पूर्ण करून तो घरी परतला. पाय धुवून आला. बेसिनपाशी येऊन घामेजल्या चेहर्‍यावर पाणी मारलं. कसल्याशा अपेक्षेने त्याने आरशात पाहिलं. तो एकटाच होता, चेहर्‍यावरून निथळणार्‍या पाण्यासह. त्याच्या खोलीत आला. कपडे बदलले. डोक्यात आता पुन्हा तिचेच विचार. “इट्स द अरेंज्ड मॅरेज ड्युड. हॅज इट्स ओन टाईप ऑफ फन!” हे मिस. सिक्वीराचे उद्गार त्याला उगीचच आठवले. त्याने तिला कॉल केला. कितीतरी वेळ रिंग वाजत होती. शेवटी तिने उचललाच.
“हॅलो”
“हाय… काय कारण दिलंस त्याला?”
“—”
“कारण दिलंस त्याला?”
“नाही”
“नाही? कारण दिलं नाहीस?? तुला मज्जा वाटतेय का सगळ्याची?”
“मज्जा काय वाटायची अरे?”
“नाहीतर काय मग?… काय बोलला तो? तो कोण आहे? काय नाव? काय करतो?”
“नावाबिवाशी काय करायचंय तुला? तो मला अनुरूप आहे असं त्याच्याबद्दल माझ्या आईवडिलांचं मत आहे. संपलं.”
“अगं पण?”
“तू नाहीस. तो अनुरूप आहे. करायचा तितका विरोध करून झालाय आणि. उपाशी राहून झालं. खोलीत कोंडून घेऊन झालं. आईवडिलांचे हेच पांग फेडलेस टाईपची डायलॉगबाजी ऐकून कंटाळलेय. संपलेय मी. तुलाही सगळी मजाच वाटते.”
“हे बघ ते तसं नाहीये.”
“कसंय मग? बोलायच्या आधी दोन क्षण विचार केला असतास?”
“इन्नफ नाऊ. सहनशक्तीच्या पलिकडे गेल्यात गोष्टी. आय वोंट टॉलरेट धिस. ऍण्ड इव्हन यू डोन्ट नीड टू…”
“—”
“आणि दोन क्षण विचार करून प्रेमात नव्हतो पडलो मी. आपण रादर…”
“—”

(क्रमशः)

Advertisements

4 thoughts on “डोकेदुखी- ३”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s