18
सप्टेंबर
11

डोकेदुखी- ५

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४ 

.
.
.

“हॅलो… कुठे आहेस? कधीची वाट बघतोय. किती फोन केले तुला.”
“त्याने सरप्राईज दिलं मला. ऑफिसला भेटायला आलाय तो.”
“क्काय?”
“ओरडू नकोस. वॉशरूममधून बोलतेय.”
“मला कधी भेटणारेस मग? मी काय मरू का आता इथे?”
“नंतर. त्याला काय सांगू? बॉयफ्रेंडला भेटायचंय म्हणून.”
“I dont fucking care. मी येतोय तिकडे.”

आई गं… डोकं माझं… हे लॅटे, फ्रॅप्पे, मोचा, मोका… सगळे कुचकामी आहेत. अशा डोकेदुखीला कडूशार एस्प्रेसो पाहिजे. दोन क्षण शांत रहायचा प्रयत्न करत त्यानं ती कडूशार एस्प्रेसो जशीच्या तशी घशाखाली उतरवली. कॉफीशॉपची अटेंडंट जवळपास अविश्वासाने त्याच्याकडे बघतच बसली.

“कुठंय तो?”
“त्याला सांगायचंय तू माझी आहेस म्हणून. आणि माझीच रहाणारेस.”
“तू आधी बाहेर चल. तो गेला. I mean घालवलंच मी त्याला. काय आणि कसली कारणं दिलीयेत माझं मला माहित. एवढंस तोंड करून गेला बिचारा.”
“तो बिचारा? आणि माझं काय? तुझं त्याच्याशी लग्न झालं तर मी तर हसतच असेन ना तोंड भरून.”
“अरे पण?”
“अरे पण काय अरे पण?”
“मी त्याला आता लग्नाला नकार दिला तर त्याला काय वाटेल?”
“त्याचं सोड. तुला काय वाटेल ते सांग? त्याच्याशी लग्न झालं तर तुला काय वाटेल?”
“हळू. रिक्षात आहोत आपण.”
“हं.”
“…”
“त्याला कधी नकार देतेयस?”
“…”
“कधी?”
“मला माहित नाही.”
“मग माहिती करून घे. आणि प्लीज साखरपुड्याची तारीख ठरायच्या आत.”
“ती ठरलीये. नेक्स्ट वीकेण्ड.”
“क्काय?”
“हळू रे.”
“मूर्ख हळू काय हळू? साखरपुडा करून मग तोडणारेस का?”
“नाही.”
“मग? की तुलाही त्याच्याशीच लग्न करायचंय? मी नकोच आहे तुला?”
“नाही रे बाबा. आपण जाऊ या कुठेतरी… शांत बसून बोलू.”
“जिथे रिक्षावाले नसतील…”
“हं”
“ओ दादा, गाडी साईडला घ्या…”

“डू यू रिअली बिलीव्ह त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे?”
“यप”
“नॉट मच एव्हिडंट… हॅव दे फरगॉटन टू लव्ह इच अदर इन द मिड्स्ट ऑफ ऑर ड्यू टू धिस हसलबसल…”
“मे बी!”
“हं. जर प्रेम ही तू म्हणतोस तशीच त्या दोघांमधली सामायिक अशी सबसेटीय भावना आहे. गोपनीय!”
“हाहा”
“तर मग प्रेमाशी अनरिलेटेड गोष्टींचा परिणाम जाणवायला नको ना”
“तीच तर गंमत आहे ना गं… तुला कसं कळतं गं परफेक्ट?”
“कारण आपण एकमेकांवर प्रेम करायला विसरत नाही ना म्हणून.”
“लव्ह यू”
“लव्ह यू टू सॅडिस्ट!”
“ए, तू थोडी जाड झालीयेस का?”
“मी? हं… बरोबर तिथेच लक्ष गेलं ना…”
“लक्ष जावं अशाच काही जागा त्या नियंत्याने निर्माण करून ठेवल्या त्याला कोण काय करणार?”
“हो रे बाबा… तुझंच खरं.”
“हं”
“संध्याकाळचा आलायस तो तसाच बसलायस घाणेरडा. झोपायच्या आधी तरी जरा आंघोळ कर व्यवस्थित…”
“बरं… जशी आज्ञा राणीसरकार.”

“तुझ्या जवळ बसण्याइतका हक्क तरी आहे माझा… दूर का जातेयस अशी?”
“आहेच रे बाबा तुझा हक्क. जे काही आहे तुझंच आहे…”
“हूं. असं बोलायचं आणि धरला हात प्रेमाने तर झिडकारायचा.”
“प्लीज.”
“प्लीज काय प्लीज?”
“तुझा नेहमीचा परफ्यूम नाही लावलास?”
“परफ्यूम? तुला परफ्यूमची पडलीये? मी काय प्रोग्राम लिहीतोय. टिम मिटींगला काय बोलतोय. कोणती शर्टपॅंट घालतोय कशात लक्ष नाहीये माझं… आणि तू? बेटर, माझा परफ्यूम लग्नात गिफ्ट करतो त्याला. यू वोंट मिस मी देन.”
“प्च.”
“…”
“मी हेच कारण देऊ त्याला?”
“तुझा आवडता परफ्यूम वापरत नाही हे?”
“नाही रे मूर्खा. अंगाला घाण वास येतो हे…”
“श्शी…”
ट्रॅफिकचं कारण देऊन तो निघाला. अर्थात तिला घेऊनच. “सोबत आता तुझं लग्न ठरतंय. उशीरापर्यंत बाहेर रहाणं ठिक नाही. सासरकडचे काय म्हणतील.”, असं कुजकट वाक्य होतंच. तिला सहन नाही झालं ते. त्याच्याकडे तरी त्याचं फ्रस्ट्रेशन बाहेर काढायला दुसरा काय मार्ग होता? कारण असं म्हणतानाही प्रवासभर त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. आणि टॅक्सीत फक्त हात पकडून स्वस्थ बसलेल्या कपल्सना तशी प्रायव्हसी मिळतेच. कुणाच्याच नजरा मुद्दामहून वळत नाहीतच तिकडे.
घराच्या कोपराशी तिला सोडलं. घराच्या दाराशी पोचल्यापोचल्या त्याच्याकडे वळून पाहिलं. स्माईल दिली तिनं पण स्ट्रीटलायटाच्या प्रकाशात चमकून गेलेला अश्रू त्याला प्रकर्षाने जाणवला. ती जाईजाईपर्यंत सारखा कट करत ठेवलेला टिव्हीसीचा कॉल उचलून फोन त्याने कानाला लावला. ती घरी गेली आता आपल्यालाही आपल्या घरी जायचं आहे हे भान त्याला फार उशीरा आलं.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: