दव, पारिजात, दूर्वा आणि तू

का सुसाट संध्याकाळीच यावी तिची आठवण
निरभ्र आकाशात तिच्याच हास्याची प्रकाशलकेर
सूर्य जाता जाता उधळून जावा

वाढत्या अंधारी साम्राज्यात आठवावेत मग
एका दवमाखल्या पहाटे एकत्र वेचलेले पारिजात
सगळे मग तुझ्या आधीच भरलेल्या ओंजळीत ओतून
आलो होतो निघून एकटाच दूर्वा वेचून

त्या पारिजातकी चेहर्‍याचीच आठवण का करून द्यावी
पूर्णबिंब चंद्राने तिच्या दवमाखल्या डोळ्यांच्या आठवणीऐवजी
खरंच सांगतो, पहाटेचं दव मला तुझंच देणं वाटत आलंय
तेव्हापासून… जेव्हा आलो होतो निघून एकटाच दूर्वा वेचून

.
.
.
.
.
तुझ्या नाजूक नाकात त्याहून नाजूक चांदीनथ
मिरवत होतीस दिवसभर, खळी पाडून हसत
तू हसलीस की नथ हलायची, नाक लाल व्हायचं
आवडलेल्या गोष्टींवर ओठ टेकवायची इच्छा तेव्हापासूनची

फक्त बघत राहिलो होतो एकटक
तू निघून गेलीस लाजून
मग पुन्हा एक पहाट, पारिजात
मी एकच पारिजात खुडला

केसात माळून घेतलास तू
मानेवर ओठ टेकवले
थरथरलीस तू
दवमाखले अश्रूभरले डोळे पाहिलेस माझे?

खार्‍या वार्‍याच्या झुळूकीने भानावर आलो
दवमाखली तू होतीस, पारिजात होता
माझे डोळे होते, माझे ओठ होते
आणि तुझी ओंजळभरून दूर्वा होत्या…

 

आल्हाद महाबळ
२ ऑक्टोबर ११
साडेसहाचा सुमार

4 thoughts on “दव, पारिजात, दूर्वा आणि तू”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s