एका भक्ताची शोकांतिका

तुझी आरास, तुझी आरती
हा डाव आहे तुला विसरण्याचा
झेंडूच्या पिवळ्या फुलामागे
तेजाळ प्रकाशगोल लपवण्याचा

अभिषेक, नवस, कौल
पावेल तेवढंच बोल
दक्षिणा दिलेली पाहून घे
कृपाही मापून तेवढीच कर

कोण तू? कधी दिसावास
आम्ही बांधल्या मंदिरांविना?
चंद्रभागेकाठी खेळण्याचा
जमाना तुझा सरलाय आता

स्वप्नात येऊ नकोस आणि दृष्टांतही देऊ नकोस
ताळेबंद मांड, भक्तांच्या संख्येचा
पर हेड दानाचा
आणि प्रसादावरच्या नाहक खर्चाचा…

फिरतोय तुझा फोटो ईमेल, एसेमेस आणि पत्रकांमधून
भक्तांपेक्षा तुझ्या (सो कॉल्ड) अवकृपेला घाबरणारेच जास्त
कळलंच असेल तुला तर एव्हाना, नाही?
कसा चालतोय तुझ्या साकाराचा शरीरविक्रय

असा पाहू नकोस चमकून
तो शब्द वापरला म्हणून
सोडू ही नकोस निश्वास, हताश
हातावर हात ठेवून, बसून

तुझ्या असंख्य अवतारांच्या,
असंख्य कमोडिटीज्‌ उपलब्ध झाल्यात
काही स्पेशल सेल्समन तुझेच, गब्बर झालेत तुलाच विकून
तुझी केलेली किंमत विचारू नकोस मात्र…

उपयोगी तर तू प्रचंडच आहेस
वशीकरण यंत्रांपासून ते
जिन्याचा कोपरान्‌ कोपरा
स्वच्छ ठेवण्यापर्यंत

मला सांग, नाही का रे तुझी एखादी
निर्गुण निराकार इमेज
जी ईमेल, एसेमेसवर नाही दिसणार कोणाला
अन्‌ ज्या अमूर्ततेची मूर्ती असणं अशक्य असेल…

नक्की देच अशी इमेज
व्हेक्टर ग्राफिक नसली तरी चालेल एकवेळ
कारण काय आहे, कितीही नाही म्हटलं तरी
तुझ्या अमूर्ततेचे फ्लेक्स बनवून चौकाचौकात लावावेच लागतील…

आजकाल कळत नाही काहीच कोणालाच त्याशिवाय
मग मात्र जाऊन बस असा
प्रत्येकाच्या हृदयात
हे निर्गुण निराकारा…

असा जाऊन बस हृदयात
की नको करायला तुझी किंमत
आणि सेल्समनबाजीला दबून जगत रहायला
बघ जमतंय का?

एक नारळ चढवेन तुला
एकशे एक दक्षिणा पुजार्‍याला
वर साडी चोळी, शेजारच्या देवीला, फ्री
वाट बघतोय, जोडून हात… विनम्रतेने…

बाकी, नारळाचं काय ते आधी कळव.
महागलेत आजकाल.

आल्हाद महाबळ
२५ नोव्हेंबर ११

4 thoughts on “एका भक्ताची शोकांतिका”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s