12
जानेवारी
12

मॉलमधे…

मुंबईतला एक मॉल. वेळ दुपार. एका मिटींगचा बोर्‍या वाजल्यावर मी मनातल्या मनात शांता गोखल्यांचा जयजयकार करत मॉलमधे दाखल होतो. सर्व्हिस लिफ्टने थेट फूड कोर्टात. तिथे पहिला साक्षात्कार छुप्या वर्णभेदाचा. कदाचित पुढे घडणार असणार्‍या अनेक गोष्टींची नांदीच. एक सोयीस्कर, इतरांपासून योग्य ते अंतर राखून असलेली जागा बघितली आणि स्थानापन्न झालो. सोबत स्टॉक भरपूर होता; शांता गोखल्यांची “त्या वर्षी” ही कादंबरी आणि खानोलकरांचा कथासंग्रह “राखी पाखरू”. आदल्या सिग्नलवर बारा रुपयात पाच इडल्यांनी पोट आवश्यक तितकं भरलं होतं. तर मॉलमधे…

नेहमीची सगळी वर्दळ होतीच. पण फारशी नव्हती. सगळे मोजून मापून प्रत्येकाशी एखाद दोन टेबलांचं अंतर सोडून बसले होते. एखादं कपल, कॉलेजचा ग्रुप, लॅपटॉप बडवणारा एखादा टायवाला इत्यादी इत्यादी. मला कोणातच इन्टरेस्ट नव्हता. मी आपलं “त्या वर्षी” मागील पानावरून पुढे चालू केलं. त्यात आपसूक ओढला गेलो. चित्रकार आणि पर्यायाने सर्वच सच्च्या कलाकारांचं जग हळुहळू उलगडत होतं. मग ते मॉलमधे बाय डिफॉल्ट वाजत रहाणारं वेस्टर्न इन्स्ट्रुमेन्टल म्युझिक मला नकोसं झालं. सकाळी सूज्ञपणे निघताना घेतलेला अजून एक निर्णय कामी आला. नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स! पुस्तकाशी मेंटली जोडलेलाच राहिलो. आणि आजूबाजूच्या जगाशी व्हिजिबली जरी जोडलेलाच राहिलो तरी ऑडिबली तोडला गेलो. असंही करण्यात एक मजा असते. समोरच्या माणसाचे संवाद आपल्या मनात आपोआपच आकार घेऊ लागतात!

कादंबरी झरझर पुढे सरकत होती. माझे कान सूफीतून सुरूवात करून नाट्यसंगीतात शिरत होते. कादंबरीत शिरलेल्या माझ्या डोळ्यांना समोरूनच येणार्‍या एका कपलने वेधून घेतलं. कपलही कदाचित नसावं ते. दिड पाऊल पुढे चालणारा मुलगा आणि हाताची घडी घालून त्याच्या मागे असणारी मुलगी. भेटी भेटीतून आवड या फेजपर्यंत आले असावेत असं मला आत्ता वाटतंय. ते येऊन पलिकडच्या सोफ्यावर शेजारी शेजारीच बसले. दोघांनीही आपापल्या बॅग्ज एकमेकांच्या विरुद्ध बाजूला ठेवल्या. मुलगा बसताना मुलगी थोडी दूर सरकून बसली. सभ्यपणे. मुलगाही शहाणा. बॅग पलिकडे सरकवण्याच्या मिशाने तो ही थोडा जवळ सरकला. आनंद आहे! मुलगी हुशार. शेजारी शेजारी अगदीच त्याला पॅरेलल बसण्याऐवजी ती गुडघे त्याच्याकडे करून बसली. आता तो ही खूश आणि ती ही खूश. कानात वसंतराव जान ओतत होते. एक उत्तम कादंबरी हातात होते. तरीही सर्वव्यापी एकटेपणाची जाणीव मनाला कुठेतरी टॅन्जण्ट मारून गेलीच. इथेच वसंतराव “लागी कलेजवा कटार…” करून पहिल्यांदा समेवर आले. त्या दोघांतही विशेषकरून पहावं असं एकही फिचर नव्हतं. दोघांनीही टिपीकली हात वगैरेही पकडले नव्हते. मुलगी गोड होती मात्र. वसंतरावांनी “चाऽऽर…” वर अप्रतिम जागा घेतली आणि मी अभावितपणे तिकडे वळून पाहिलं. तो काहीतरी जनरल बोलत होता. आणि ती टक लावून त्याच्या चेहर्‍याकडे पहात होती. वसंतराव त्यांच्या धारदार तानांसह करेजवां…. मधे शिरले; गाण्यात आणि माझ्याही; अन्‌ त्याक्षणी त्यानं तिच्याकडे वळून पाहिलं. अर्थात, थेट डोळ्यांत. सव्वा क्षणापेक्षा जास्त टिकला नाही पण क्षण अप्रतिम होता तो!

इकडे कादंबरी अत्यंत सेन्सीबली कलाकारांच्या आपसातल्या केमिस्ट्रीत शिरत होती. एक शास्त्रिय संगीतात नवे प्रयोग करू इच्छिणारी गायिका, तिचा रूढार्थाने कलाकार नसलेला नवरा. तिचे त्यांच्यातल्याच एका खुशालचेंडू चित्रकारासोबत पूर्वी असलेले संबंध. एक शिक्षिका, तिचा चित्रकार भाऊ, त्यांचं कुटूंब, एक श्रीमंत पारशी चित्रकार वगैरे वगैरे. एक गायिका सोडली तर रूढार्थाने संसारी आता कुणीच नाही. कलाकारांना एकटेपण इनेव्हिटेबल असावं का?

शब्दांतून थोडी उसंत घेऊन वसंतराव सरगम आळवू लागले. माझं लक्ष पुन्हा एकदा तिकडे, आपोआप. मुलगा तिथे नव्हता. मॅक्डोनाल्ड जिंदाबाद! तिनं आपलीच बोटं एकमेकांत गुंफून त्यावर हनुवटी ठेवली होती. नजर अज्ञातात; एकटक. स्वच्छ शांत डोळे… मुलगा भाग्यवान आहे. कानांमुळे की कसं ते माहित नाही पण एक माईल्डशी सरसर पाठीतून हातांत येऊन गेली.

करेजवांत लागलेली कटार माझ्यात पूर्ण भिनली होती. पुन्हा एकदा. हे लिहीतानाही आत्ता एक तशीच सरसर वसंतरावांना सलामी देऊन गेलीये; ती नुस्त्या आठवणीने… मॉल्सना नव्या शहरी समाजजीवनाचं केन्द्र वगैरे म्हणण्याचा माझा पिंड नाही तेव्हा इति लेखनसीमा.

 

 

Advertisements

5 Responses to “मॉलमधे…”


 1. 1 Anupama
  जानेवारी 15, 2012 येथे 9:39 म.पू.

  mastt lihilay……sagala chitra dolyasamor ubha rahila ……

 2. 2 Nil
  मे 25, 2012 येथे 4:08 म.उ.

  रीअ‍ॅलिटी, म्युझिक आणि कादंबरी :
  शेझवान “ट्रिपल राईस 🙂

  “त्या वर्षी” किमान ह्या वर्षी तरी वाचावी लागणार !

  • 3 आल्हाद alias Alhad
   मे 26, 2012 येथे 1:22 म.उ.

   नक्कीच वाच.
   तुझ्यासाठी म्हणून सांगतो, मुंबईचं चित्रण पण सुंदर आहे कादंबरीत.

   • जून 2, 2012 येथे 12:06 म.पू.

    यो , वाचली!
    मस्तच आहे …या शांताबाई कोण ? कधी आधी नाव ऐकलं नाही

    एक गोष्ट खटकली म्हणजे सगळे टेरिबल अन्याय ..नवऱ्याचा खून, चित्राची फाडाफाड वगैरे सगळी पात्र नको इतक्या समजूतदारपणे सहन करतात …जानकी बापाला चमाट देते त्याचा अपवाद सोडता!

    पण मुंबई आणि क्रीएटीव्ह प्रोसेस चं वर्णन वगैरे मस्तच.

 3. 5 आल्हाद alias Alhad
  जून 2, 2012 येथे 10:49 म.पू.

  नील,
  तू पल्लवी जोशी आणि जॅकी श्रॉफने केलेल्या रीटा सिनेमाबद्दल ऐकलं असशील. तो सिनेमा शांता गोखल्यांच्याच रीटा वेलिणकर ह्या कादंबरीवर आधारीत होता.

  तुला जी गोष्ट खटकली त्याच्या उत्तराकडे जाणारा रस्ता तूच लिहीलेल्या शेवटच्या वाक्यात आहे; जानकीबद्दलच्या. आर्टिस्टलोक ही मुळात निरुपद्रवी जमात. जी गोष्ट रुढार्थाने मांडता येत नाही त्या गोष्टींसाठी विविध प्रकारे सिंबॉल्स शोधत बसणारी. चित्राच्या फाडाफाडीबद्दल तू बरोबर आहेसही. पण एखाद्या दंगलीत, उदाहरणार्थ, गेलाच आपलाही जीव तर असं काय करणारेत, आपल्या गर्लफ्रेंड्स, आया, बहिणी… किंवा कुणीही!

  असो. मुळात आर्टिस्ट्स आणि नॉन आर्टिस्ट्स लोकांची आयुष्य एकत्र करून जी काय मज्जा केलीये तिला तोड नाही. ती क्रिएटिव्ह प्रोसेस आपलीच वाटते. नाही का?

  ताबडतोब कादंबरी वाचून इथे पुन्हा अभिप्राय दिलास… 🙂 बरं वाटलं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

 • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: