दुःखवर्णनाचे वर्णन- शेवट

दुःखवर्णनाचे वर्णन- सुरूवात

दुःखवर्णनाचे वर्णन- मध्य

 

दुःखवर्णनाचे वर्णन- शेवट

तो शब्द भेटला पाहिजे

होय, भेटलाच पाहिजे
हाडामांसाच्या माणसासारखा

दुःखाचं वर्णन तो करणार नाही
ते अनुभवल्यानंतर त्याला ते जमणारही नाही
पण तो एक करेल, खरं बोलेल
प्रामाणिक बोलेल.

त्याचा खरेपणा दुःखाला
न्हाऊ माखू घालणार नाही
दुःखाच्या डागण्या मात्र पोचवेल;
अनऽडल्टरेटेड

त्याला कसलीच दाद मिळणार नाही
कदाचित साधी प्रतिक्रियासुद्धा नाही
पण जाणीव, दुःखाची जाणीव मात्र
पोचेल खरीखुरी, प्रामाणिक आणि शुद्ध…

राहील लक्षात दुःख, दुःखरूपातच
शब्दांच्या अतिशहाण्या भेसळीशिवाय

मग हे असं,
दुःख कुणाला सांगायला जाताना,
शब्दांना मिळणार नाही दाद,
तुम्हाला मिळणार नाही सहानुभूती
पण हो,
तुमची जाणीव मात्र तरीही,
पोचलेली असेल… पलिकडे
तिथवर…
आतवर…

 

समाप्त

आल्हाद महाबळ

2 thoughts on “दुःखवर्णनाचे वर्णन- शेवट”

Leave a reply to leena उत्तर रद्द करा.