18
जून
12

अर्थ-अनर्थाची कविता

मला खूप काही म्हणायचं असतं
मांडायचं असतं
बोलून दाखवायचं असतं तुला

रचत जातो शब्दबाहूंचे इमले
दृष्टीक्षेपात खोल अर्थ ठेवून
शब्दांच्याच दीपमाळा
वाट प्रकाशत जातात अर्थाकडची

अनर्थाचे खड्डे चुकवत…

मला खूप काही म्हणायचं असतं
मांडायचं असतं
बोलून दाखवायचं असतं तुला, वेळोवेळी
मी करतोही तसं

पण शब्दांच्या दीपमाळा
कसल्या ह्या थैमान वार्‍यात विझल्या?
तेल उडून गेलं
वाती कावळ्यांनी नेल्या

का पोहोचत नाहीत
शब्दावगुंठीत अर्थ?
का निव्वळ पडतात टाळ्या?
किंवा होतात (तुझे!) गैरसमज?
यमक, उपमा, अलंकार
आणि प्रासांच्या योगे

मित्राच्या पाठीवरल्या थापेतून…
तुझ्याशी तासन्‌तास गप्पा मारल्या डोळ्यांतून…
पोचलेले अर्थ शब्दावगुंठनात विरघळतात का?

तुझं वागणं, तुझं बोलणं
तुझं हसणं, तुझं खेळणं
फक्त तू चालताना माझ्या घट्ट धरल्या हातात येऊन थांबतं

मग तुझ्यावर चुंबनांचा वर्षाव करत
तुझ्या हृदयाशी आलो तेव्हा,
तेव्हा प्रसवलेली ती कविता कुठे गेली?

शब्दांच्या दीपमाळा कशा प्रज्वलित करू?
तेल, वाती, दिवाबत्ती,
सोय कुठून करू?

हे असं होतं बघ
मला खूप काही म्हणायचं असतं
बोलून दाखवायचं असतं…
आणि ऐनवेळी आख्यान लावतो दुसरंच.

आल्हाद महाबळ
१२:१२ रात्र
१८ जून १२

Advertisements

2 Responses to “अर्थ-अनर्थाची कविता”


  1. जून 19, 2012 येथे 12:18 म.उ.

    मस्त झालीये रे. अवस्था अचूक पकडलीये. (अनर्थाचे खड्डे चुकवत, गैरसमज , आख्यान, तेव्हा प्रसवलेली कविता ) मस्तच.

  2. जून 30, 2012 येथे 10:08 म.उ.

    Surekh. Muktachhand changla zalay. Shabdahi uttam.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: