विहीर

बर्‍याच वैयक्तिक म्हणाव्या अशा संदर्भांनी ही कविता नटलेली (फार साहित्यिक! निव्वळ वैयक्तिक संदर्भ आहेत इतकंच म्हणायचंय खरंतर.) असल्याने ब्लॉगवर टाकावी का? टाकलीच तर वाचकांपर्यंत (if any, not many!) कितपत पोचेल असंही एक वाटून गेलं. नाहीतरी अवघड किंवा ऍब्स्ट्रॅक्ट लिहीणारा म्हणून मी बदनाम आहेच… शेवटी ब्लॉगही माझाच आणि कविताही माझीच असा विचार करून (हा विचारही माझाच.) मी ही कविता आता इथे पोस्टतोय. नाव दिलंय विहीर.

वि.सू.: ह्यातील विहीर आणि अंधाराचं संदर्भ माझ्या एकटेपणापेक्षा नुकत्याच पाहिलेल्या डार्क नाईटशी जाऊन मिळतंय का याबद्दल माझ्याही मनात अजूनही संदेह आहे. असो.

रात्रीला आताशा घाबरतो मी
रात्र, म्हणजे सभोवताली अंधार
मग झोपताना दिवे मालवायचे
म्हणजे अजून अंधार
त्यात डोळे मिटले की
एखाद्या खोल अंधार्‍या विहीरीत
फेकलं गेल्यासारखं वाटतं

खोल अंधारी विहीर
डोक्यावरचा, प्रचंड उंचावरचा
पण मॅंडेटरी, प्रकाशकणही नसलेली
खोल अंधारी विहीर

मग खाडकन्‌ घाबरून डोळे उघडतो.
तेव्हा साजरं होतं विहीरीतच एक जग
आजूबाजूला
कुठूनतरी रेंगाळत आलेली
नागवी प्रकाशाची तिरीप
सार्‍या अंगावरून खसफसून जाणारं
पंख्याचं गार गरम वारं
आणि मी मनात खोलवर दाबत असतो
अंधारी विहीर

मॅंडेटरी प्रकाशकणही नसणारी

ह्या विहीरीत सर्वव्यापी ओल नाही
बिन उजेडाचा दिवस जणू
वाघळं नाहीत
उंदीर चिचुंद्र्याही नाहीत
आहे तो फक्त
भयाण अंधारी एकटेपणा

फक्त खोलवर फेकला जात रहातो रात्रभर
सकाळी उठताना निव्वळ एक वाईट स्वप्न, म्हणून
विसरता न यावं इतकी खरी असते रात्र
विहीर आणि सर्वव्यापी कोरड्या
अंधाराची रात्र…

आल्हाद महाबळ
११.३१ रात्र
२९ जुलै १२

Advertisements

5 thoughts on “विहीर”

 1. कालच पुण्यात झालेल्या बॉम्ब ब्लास्टिंग च्या घटनेनंतर असेच काहीसे विचार मनात आले होते, नक्की काय फील होतंय तेच कळत नव्हतं. अशात तुझी कविता वाचली आणि जाणवलं.. हेच ते…. काल खरंच शब्द तोकडे पडले होते…..

 2. डार्क नाईटशी जाऊन मिळतंय का, नक्कीच.. पण हे परसेप्शन निराळं आहे, चक्रीय विहिरीसारखंच..अबोध भावानेतलं, मला ‘विहीर’ गिरीश-उमेश कुलकर्णींची आठवली लग्गेच. .

 3. श्रद्धा कुलकर्णी,
  ही कविता ब्लास्टस्‌च्या आधी लिहीलेली आहे. तेव्हा बॉम्बब्लास्ट नंतरच्या (अपरिहार्य) अस्वस्थतेला कशी जाऊन मिळते हे (संदर्भ) जरा तपासून बघतो. 🙂
  . ,
  धन्यवाद.

 4. “सार्‍या अंगावरून खसफसून जाणारं
  पंख्याचं गार गरम वारं
  आणि मी मनात खोलवर दाबत असतो
  अंधारी विहीर”

  हो रे. हे शब्दात मांडता आलं नसतं मला. असा अनुभव येतो बर्‍याचदा.
  सुरवातीचं स्वगत लिहायला नको हवं होतं. वाचकांना कवितेत पूर्वग्रह न ठेवता घुसूदे. कवीनेच संगीतकाराकडे चाल गुणगुणत जाण्यासारखं आहे हे. लिहीणं आवश्यक असेल तर शेवटी लिहावंस असं मला वाटतं.

  1. मान्य आहे तुझं म्हणणं. पुन्हा स्वगतच सांगायचं तर ह्या कवितेची प्रोसेस जरा जास्तच पर्सनल टायपातली होती… त्यामुळे मला हे लिहीणं गरजेचं भासलं.

   अर्थात हे अपवादात्मकच!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s