मुंबईत येताना…

आधी याहू जिओसिटीज्‌वर, मग गेली काही वर्ष इथे वर्डप्रेसवर ब्लॉग लिहीत आहेच. पण ह्यावेळेस मनात जे विचार आले ते लिहीत न सुटता कॅमेर्‍यासमोर बोलत गेलो. बोलता बोलता फुकाट खाल्लेलं फुटेज कापून टाकलं. आजूबाजूच्या इतर गोंधळातून माझा आवाज साफसूफ करून घेतला आणि अपलोडलाय.

ब्लॉग वाचायला वेळ काढता तसा ब्लॉग बघायला वेळ काढा ह्यावेळी.

पुढच्या वेळेस ह्याहून चांगला व्हिडिओ करण्याची इच्छा आहे.
तोवर नमस्कार.

5 thoughts on “मुंबईत येताना…”

  1. तुझा चेहरा व्हिडीओजेनिक आहे. फोटोजेनिक तर माझाही आहे रे. पण व्हिडिओसमोर आल्यावर माझा राहुल गांधी होतो.
    असो. कंटेट पोचतंय.. बाकी मुद्यावर लवकर येत जा बास 😀 नाहीतर व्हिडीओची लांबी तरी वाढव.

    1. व्हिडिओजेनिक! व्वा!! असो पण ते…
      बाकी मुद्द्याचं लक्षात नक्की ठेवेन.
      हे इम्प्रोव्हाईज्ड होतं. पुढच्या वेळेस कंटेंट स्क्रिप्टेड करेन.
      धन्यवाद.

  2. छान आहे प्रयत्न. झोपड्यांमधून चकाचक रस्ते, चकाचक गाड्या जाणं किंबहुना झोपडपट्टी/वस्त्या आणि अत्याधुनिक इमारती यांचं नातं अतूट आहे. (जोपर्यंत पाश्चात्य देशातील महाग लेबर आपल्या देशातही येत नाही तोपर्यंत तरी…) मोठमोठ्या बंगल्यांतून, इमारतींमधून काम करायला लागणारे स्वस्तातले कामगार याच गलिच्छ वस्त्यांमधे राहतात. त्यांना जर दुसरीकडे हलवायचं म्हंटलं तर त्यांचे पगारही जबरदस्त वाढवावे लागतील (टीए वगैरे सकट). कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन कविता आठवली. “बाकी कोणत्याही पक्षाचा संघटनेचा झेंडा या वस्त्यांमधून दिसू देत त्याखालची घाण मात्र सारखीच” हे एकदम खरंय (दुहेरी अर्थाने).

यावर आपले मत नोंदवा