20
ऑक्टोबर
13

पियूजी

सूर्य मावळला होता. शहर नुकतंच उजळू लागलं होतं. मी कारमधे एकटाच शहराच्या दिशेने सुसाटत होतो. गरम वारा कानाशी भणाणत होता. चौक आणि सिग्नल्स संपून फ्लायओव्हर्स सुरू झाले की शहराची सुरूवात झाली असं समजायला हरकत नसते. पहिलावाहिला फ्लायओव्हर आता येण्याच्याच बेतात होता. अगणित माणसांचे अगणित इमले आजूबाजूनी उठत होते आणि मी कारमधे एकटा; शहराच्या दिशेने. कारमधे गाणी चालू होतीच कधीची. प्राचीचं करे कौन उपाय लागलं… फ्लायओव्हरला चढ म्हणून काही नाहीचे अशा दिमाखात कार वर चढली. शहराबाहेर वेशीशी वाढलेल्या गलिच्छ वस्त्यांना पायाआड करून थेट शहराशी ओळख करून देणारा हा फ्लायओव्हर. मन जल जल जाय… आर्ततेने जणू माझे कान पकडून पिळलेच… ब्याकुल है प्राण पियूजी उस पार बुलाये… हातातलं स्टिअरिंग थरथरलं. चढ संपताना मी पहिल्यातून मधल्या लेनमधे आलो. उजवीकडून एक अजस्त्र एसयूव्ही झापकन्‌ पुढे निघून गेली. मी फ्लायओव्हरच्या वरच्या टोकाला होतो. माझ्या पुढे अंधारात गुडूप झालेला उतार होता. आणि डोळ्यासमोर अनेक टॉवर्सच्या पुंजक्यांची कभिन्न भिंत. मी कारमधे एकटा. समोर प्रचंड शहराच्या प्रचंड लोकसंख्येला अंगाखांद्यावर खेळवणारा टॉवर्सचा पुंजका…
पियूजी शब्द कसला आहे हा! स्मृतीत एव्हाना फिकुटलेल्या ब्रेकपनंतर पुन्हा एकदा एकटेपणाची जाणीव आणि तिची आठवण एकत्रच आली. मी कारमधे एकटा टॉवर्सच्या कभिन्न पुंजक्याच्या दिशेने सुसाट उतरत होतो.

उपसंहार
ट्रॅफिकमधून वाट काढून घरी पोचलो. कपडे बदलले. हेडफोन्स कानात घातले. दिवा बंद केला. पलंगावर आडवा झालो. पंख्याच्या गरमगार वार्‍यात सुन्न पडून राहिलो. मोबाईलमधे पुन्हा प्राचीला बोलावलं. पियूजी शब्द भारीच गोड आहे. एकटेपणा विसरून जावा इतका गोड. मग टॉवर्सच्या पुंजक्यांची कभिन्न भिंत माझ्या भोवतीच्या अंधारात विरघळून जाते. आणि मी, आर्तता, तिच्यामाझ्या आठवणी, प्राचीचे सूर सगळं अभिन्न होत रहातं.

२०:१३
२० ऑक्ट १३

P.S.:
कोण कुठली ही प्राची आणि कसलं हे गाणं? आमची फेसबुकीय मैत्री नुकतीच झालेली असली तरी एकमेकांच्या नावापलीकडे ओळख शून्य. तरी नातं आहे. तेच नातं जे आवाजाच्या विशिष्ट वेव्हलेंग्थस्‌चं हृदयाच्या विशिष्ट तारांशी असतं. ज्या हक्कानं मी पावसाळी मध्यरात्री वसंतरावांना बगळ्यांची माळफुले गायला बोलवत असे त्याच हक्कानं एखाद्या निवांत सायंकाळी सभोवतालच्या गोंधळघाल्या गर्दीचा वीट आल्यावर प्राचीला बोलवतो… तिचे सूर माझ्या मनाशी गप्पा मारतात, त्याही दरवेळी नव्या… मला बापुड्याला अजून काय हवं?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: