थ्रिफ्टी चिकन

समस्त खादाड आणि गरीब जनतेसाठी सादर आहे ‘थ्रिफ्टी’ चिकन. थ्रिफ्ट म्हणजे काटकसर. पण ह्या पाककृतीत काटकसर आहे ती फक्त किमतीत, चवीत नाही. नवनवोन्मेषी ब्लॉगर (म्हणजे मीच!) सहर्ष सादर करीत आहे थ्रिफ्टी चिकन.

थ्रिफ्टी चिकन

“थ्रिफ्टी चिकन म्हणजे पोटभर चिकन ते ही फक्त एकोणपन्नास रुपयात!”
टिंग टिंग टिडींग

नाही नाही मी राज बब्बर किंवा राहुल गांधी यांपैकी कुणाचाच नातेवाईक/वारसदार/संबंधीत/हितचिंतक नाही. तरीही ‘पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे’ ह्या जाहिरातीतल्या किंवा “करून दाखवले” ह्या राजकारणातल्या तत्वानुसार मी एकोणपन्नास रुपयांत चिकन केलं आणि खाल्लं सुद्धा! तर थ्रिफ्टी चिकनची पाककृती खालीलप्रमाणे.

साहित्य आणि खर्च:

१०० ग्रॅम बोनलेस चिकन = रुपये ३०

३-४ मिरच्या, थोडी कोथिंबीर, एक छोटा कांदा = रुपये ४

ब्रेडचा छोटा पॅक = रुपये १२

हळद, मीठ, तिखट, पाणी (किंमत अंदाजे) = रुपये ३

एकूण खर्च = रुपये एकोणपन्नास

साहित्य

कृती:

१. चिकनचे तुकडे धुऊन घ्यावे.
२. हळद, चवीप्रमाणे मीठ व हवे असल्यास थोडे तिखट चोळून लावावे व बाजूला ठेऊन द्यावे. मॅरिनेटेड चिकन
३. कांदा, चवीप्रमाणे मिरची व थोडीशी कोथिंबीर शक्य तितकी बारीक चिरून/कापून घेणे. मसाला
४.चिकनचे तुकडे साधारण बुडतील इतक्या पाण्यात शिजवून घ्यावेत. चिकन शिजलं की उरलेलं पाणी सूप म्हणून प्यावे आणि पुढच्या धंद्याला लागावे. चिकन सूप
५. फ्राईंग पॅन/कढई किंवा तत्सम भांड्यात फोडणीपुरते तेल घ्यावे. गरम करावे.
६. गरम तेलात कांदा, मिरची, कोथिंबीर टाकून परतावे. मसाला परतणे
फोटो कांदा मॅश करायला वापरलेल्या वाटीसह!
७. कांदा शिजून मऊ पडल्यासारखा वाटला की त्यात चिकनचे तुकडे घालून परतावे. चिकन परतताना
८. रश्श्यासाठी पाणी ओतावे. एक उकळी आणावी. तयार थ्रिफ्टी चिकन
९. चव घेऊन पहावी. तिखट वाटल्यास थोडे अजून पाणी किंवा अळणी वाटल्यास थोडे मीठ घालावे.
१०. थ्रिफ्टी चिकन तयार आहे. आता ते वाढून घ्यावे व ब्रेडसोबत हादडायला बसावे!

अशा प्रकारे निव्वळ एकोणपन्नास रुपयांमधे व फक्त १० सोप्या पायर्‍यांमधे तयार होणारं हे ‘नवनवोन्मेषी’ थ्रिफ्टी चिकन समस्त खादाडांच्या मुखी अर्पण!

इति मम रविवारस्य दुपारम्‌ सफल संपूर्णम्‌!
चिकन संपलं

Advertisements

2 thoughts on “थ्रिफ्टी चिकन”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s