09
ऑक्टोबर
14

वेडेपणाचे पुरावे

जपून ठेवावेत आपल्या वेडेपणाचे पुरावे

जपून ठेवावीत गर्लफ्रेंड असतानाची मोबाईल बिलं
जपून ठेवावीत नखं नाण्यांनी खरवडलेली रिचार्ज कुपन्स
भूतकाळाबद्दल कसलीही आपुलकी उरली नसली तरी
जपून ठेवावेत आपल्या वेडेपणाचे पुरावे

जपून ठेवाव्यात सगळ्या मार्कशीट्स
जपून ठेवावीत ट्रॅफिक पोलिसानं फाडलेली चलने
जपून ठेवावेत जुने प्रवास तिकीटांमधून
जपून ठेवावे बालपण फोटोमधून

काडीचाही उपयोग नसलेल्या शिक्षणाच्या
ट्रॅफिक पोलिसावर असलेल्या रागाच्या
जुन्या प्रवासांतल्या जुन्याच अनुभवांच्या
वाया गेलेल्या किंवा समृद्ध बालपणाच्या
भूतकाळाबद्दल कसलीही आपुलकी उरलेली नसली तरी
जपून ठेवावेत आपल्या वेडेपणाचे पुरावे

आता आपण साधंसुधं जगतो
रॅशनली वागतो
जास्त चिडत नाही
उगा प्रेमातही पडत नाही
पोट भरण्याएवढं काम
आणि मन भरण्याएवढ्या सोबतीवर संपून जातं आयुष्य
वेडेपणाला फुरसत उरतच नाही
म्हणून जपून तरी ठेवावेत आपल्या वेडेपणाचे पुरावे
भूतकाळाबद्दल कसलीही आपुलकी उरलेली नसली तरी

१३ जुलै १४
९:१५ सकाळ
(कांदिवलीचे घर सोडताना)

प्रतिसार:
आपल्या वर्तमानालासुद्धा आपल्याबद्दल कितपत आपुलकी असेल हे सांगता येत नाही.

Advertisements

2 Responses to “वेडेपणाचे पुरावे”


  1. 1 Leena
    ऑक्टोबर 10, 2014 येथे 3:57 म.उ.

    “वेडेपणाला फुरसत उरतच नाही
    म्हणून जपून तरी ठेवावेत आपल्या वेडेपणाचे पुरावे”

    इथे कळला कवितेचा खरा अर्थ … माझ्यापुरता तरी ..आणि मग प्रतिसार…


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: