31
मार्च
15

झाडे

दिवसभराचा मानसिक थकवा घालवायला मी जोरजोराने व्यायाम करतो. शेवटी तिथल्या तिथेच आडवा होतो, शवासन किंवा कूल डाउन वगैरे नुसत्या सबबीच. पंख्याचा गरम वारा अंगावर भिरभिरत राहतो. इन द मूड फॉर लव्ह मधलं वेडं व्हायोलीन आजवरच्या अनेक उष्ण पानगळींच्या दिवसांची आठवण करून देत रहातं. झाडं हुशार असतात. जुन्या वाळक्या आठवणींना अलगद वाऱ्यावर सोडून देतात. एकच उन्हाळा सहन करतात आणि वळवाच्या पावसासोबत पुन्हा तरूण होतात.
आपण मूर्ख असतो, जन्मतःच. आपण रोज रात्री कुमार गंधर्व, वीकेंड्सला यमन, पावसाळ्यात मल्हार अशी नित्य नवी मलमं लावत बसतो आठवणींना; आज नाही तर उद्या त्या वाळक्या कुरकुरीत आठवणी पुन्हा हिरवागार वर्तमान बनून येतील असल्या वेडझव्या आशेत. एखाद्या अनवट तानेनं किंवा अनपेक्षित समेनं ठोका चुकतो आणि जखम भळभळू लागते पुन्हा.
हे भळभळणं सहन व्हायच्या पलिकडचं असतं. मग लकी अली किंवा केकेच्या पॉप गाण्यांचा आश्रय असतो. त्यातही शुभा मुदगलांचं अब के सावन ऐसे बरसे ऐकल्याशिवाय प्लेलिस्ट संपत नाही. आशिकी २ ची गाणी लूपमधे ऐकणाऱ्या मित्राला शिव्या घालणं कितीतरी सोपं असतं. पण हंस अकेला ऐकल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही त्याचं कारण काय?
मूर्ख सगळेच असतात. मलमं आपापली वेगळी… वाळक्या पानांवरून आवाज करत जायला आवडतं खरं आपल्याला पण कशावरून वैश्विक झाडांची वैश्विक दुःखंच आपल्यावर भूत बनून बसत नसतील?

.

.

 

Time is different for a tree than for a man. Sun and soil and water, these are the things a weirwood understands, not days and years and centuries. For men, time is a river. We are trapped in its flow, hurtling from past to present, always in the same direction. The lives of trees are different. They root and grow and die in one place, and that river does not move them. The oak is the acorn, the acorn is the oak. – GRRM

Advertisements

0 Responses to “झाडे”  1. टिपणी करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

  • 32,576 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

लोकप्रिय लेखन

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: