उणीवा आणि ओळख

तू काय आहेस हे तुझं तुला कळल्याशिवाय तुला कोण हवं आहे हे कसं कळेल? आपण आपल्याच जगण्याच्या बेड्या तोडून बाहेर पडलो नाही तर दुसर्‍याचं जगणं आपल्याला कसं समजून घेता येईल. तुला कळतंय का, आपण एका मोठ्ठ्या जिगसॉ पझलचे तुकडे आहोत. आपल्या आजूबाजूला कुठले तुकडे बरोबर बसतात हे बघण्यासाठी आपण आपल्या तुकडेपणातून बाहेर यायला नको? पण मग त्यासाठी आपल्या तुकडेपणाच्या सीमा चाचपडणं आलं. आपण कुठे कमी पडतोय ते कोरून बघणं आलं. वेदनादायी आहे हे एकूणच. पण गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपल्याला कवेत घेऊन बसलेला तुकडा आपल्या उणीवेकडे कसा बघतोय हे कसं कळणार? तुझी उणीव तो भरून काढू शकतो म्हणून की तुझ्याचसारखी उणीव एखादी त्यालाही आहे म्हणून. आपल्या जगण्याच्या बेड्या तोडून बाहेर पडलो नाही तर त्याच्या उणीवेला कवेत कधी घेणार? की फक्त आपल्याच उणीवांना कवेत घेणारे शोधत फिरणार आयुष्यभर?
ह्या बेड्या तोडायच्या म्हणजे काय करायचं? बंधनं नाकारायची. आपल्या उणीवांना कवेत घेणारं कुणी भेटावं म्हणून त्यांना हुळहुळत ठेवण्यात काय अर्थ आहे? तो माझ्या उणीवांना समजून घेतो म्हणून त्याच्या कवेत शिरण्याऐवजी त्याच्या येण्यानं माझ्या उणीवा उरल्याच नाहीत तर? अर्थात्‌ असा कुणी मिळावाच असा आग्रह नाही आणि शाश्वती तर त्याहून नाही. आपल्याला आपल्याच उणीवा भरून काढायला दुसर्‍या कुणाची गरज भासू नये इतकंच. आपल्याला कुणी ना कुणी हवं असतं. का हवं असतं? मिळाल्यावर आपल्या जगण्यात त्याच्या येण्याने नक्की काय होणार असतं? कंपॅनियनशिप, प्रेम, सेक्स ह्या फार वरवरच्या गोष्टी आहेत मला जे म्हणायचंय त्या गोष्टीच्या. तेवढ्यावरच गोष्टी थांबत नाहीत. फार खोल खोल उतरत रहातात आपल्या जगण्यात आयुष्यभर. ह्या गोष्टीला नाव नाही. पण कवेत शिरताना असं पलिकडचं उत्तर क्षणभरासाठी जरी मिळून गेलं तरी खूप झालं! स्वतःच्या ओळखीशी दुसर्‍याच्या ओळखीची सांगड घालून देण्याचा सगळा झगडा आहे हा. कधी जमतो. कधी तुटतो. झगडा करून करून एकदा का मातीत लोळलं की मग अनेक गोष्टी सोप्या होतात. मुख्य म्हणजे ग्रेसफुली हारता येतं. नव्या उत्साहाने झगड्यात पडता येतं. काहीच जमत नसेल तर स्वतःला असलेल्या स्वतःच्या ओळखीसारखं क्षणभंगूर काही नाही.
कोणी हवं आहे असं वाटेपर्यंत आणि तो मिळेपर्यंत स्वतःलाच चाचपत रहायचं. नव्याने ओळखत रहायचं; आणि काय?

-आल्हाद
३० ऑगस्ट १५
२१:३२

Advertisements

One thought on “उणीवा आणि ओळख”

 1. >>>
  झगडा करून करून एकदा का मातीत लोळलं की मग अनेक गोष्टी सोप्या होतात. मुख्य म्हणजे ग्रेसफुली हारता येतं.
  >>>
  +100 for this.
  I could relate to it at so many levels…
  & if some reader some where says,”Oyi thats exactly my feeling” … u win as a writer 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s