गणपती २०१६

गणपतीच गणपती आहेत सगळीकडे. हलती आरास आहे. स्पीकर्स आहेत. गणेशमूर्तीसुद्धा आहे. प्रत्येक गणपतीच्या आडोशाला प्लास्टिक पसरून कोणी कोणी बारीकसारीक खेळणी, फुगे असं काय काय विकतंय. सगळ्यातून ट्रॅफिक सुरू आहे.
त्यातच पार्किंगमधल्या गाड्यांच्यात एक मोकळी जागा शोधून एकीने प्लास्टिक पसरलंय. त्यावर चमकत्या दिव्यांची खेळणी हारीने मांडून ठेवलीयेत. सगळ्या रोषणाईत खेळण्यांवरचे लुकलुकते दिवे आपलं छोटंसं अस्तित्व टिकवून आहेत. तिच्या मांडीवर एक छोटं पोरगं बसलंय. लुकलुकत्या दिव्यांकडे झेप घेतंय. ती बाई त्याला लगेच मागे खेचून घेतेय. अडकलेल्या ट्रॅफिकला सुटता सुटता शिव्या घालत दुसऱ्यावरून तिसरा टाकून वेग वाढवताना एवढंच दिसतं.
कामाने डोकं शिणलंय. दिवसभर फोटोशॉप, लाईटरूम, जीमेल आल्ट टॅब करून डोळे थकलेत. खेळण्यांकडे झेपावणाऱ्या पोराची एक फ्रेम तरीही डोक्यात जाऊन बसते. घर जवळच आहे. तरी अजून २-३ गणपती पार करायचेत.
ही फुगेवाली बाई फार हुशार आहे. जिथून पूर्ण आरास दिसू लागते तिथून तिचा फुग्यांचा गुच्छच आधी दिसेल अशा ठिकाणी येऊन उभी आहे. मधूनच फुगे वर उडवते. लक्ष असो वा नसो. फुगे विकायला आहेत हे आवाज न काढता सगळ्यांना कळतं. फुगे वर उडवले की मागून येणाऱ्या गणपती मंडपाच्या प्रकाशाच्या वर जातात. आणि हळूहळू खाली येताना त्या प्रकाशात न्हाऊन निघतात. ती बाई, हातातला फुग्यांचा भलामोठा गुच्छ आणि मागे गणपती आणि हलती आरास… हीही एक फ्रेम डोक्यात रेकॉर्ड होते. मी मंडप क्रॉस करेस्तोवर लो लाईट आणि कव्हरेजच्या हिशोबाने आय एस ओ आणि वाईड अँगल लेन्सचं गणित मांडू लागतो.

“आल्हाद लेका बनचुका तू फोटोग्राफर. खरा असतास तर बाईक साईडला लावून मोबाईलने का होईना पण फोटो काढले असतेसच.”

मी घरी येतो. संपलेल्या, चालू असलेल्या, उद्या करायला घ्यायच्या कामाची मनात उजळणी करतो. आई चहा देते. मी फेसबुक लावतो.

८:१८ रात्र
७ सप्टेंबर १६

Advertisements

2 thoughts on “गणपती २०१६”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s