काळा चहा करायची पद्धत

नेहमीच्या चहाचा कंटाळा आल्याकारणाने काहीतरी वेगळं करून पहायचं होतं. त्यातच आजकाल जेमी ऑलिव्हर, अकिस किचन, वाहशेफ, गेट करीड वगैरे रेसिपी व्हिडीओज्‌ बघणं चालू असल्याने स्वतःच व्हिडीओ करून पहावा म्हटलं. काळा चहा करायची पद्धत वाचन सुरू ठेवा

गणपती २०१६

गणपतीच गणपती आहेत सगळीकडे. हलती आरास आहे. स्पीकर्स आहेत. गणेशमूर्तीसुद्धा आहे. प्रत्येक गणपतीच्या आडोशाला प्लास्टिक पसरून कोणी कोणी बारीकसारीक खेळणी, फुगे असं काय काय विकतंय. सगळ्यातून ट्रॅफिक सुरू आहे. गणपती २०१६ वाचन सुरू ठेवा

लिपस्टिक लावलेली भिकारीण

समोरच्या चौकात बसलीये
लिपस्टिक लावलेली भिकारीण
कळत असतील का तिला लाल लिपस्टिकचे
स्त्रीवादी, व्यावसायिक किंवा पुरुषसत्ताक अर्थ? लिपस्टिक लावलेली भिकारीण वाचन सुरू ठेवा

डिजिटल

आजचं युग डिजिटल आहे
मी डिजिटल युगाचा खंदा पाईक आहे
मी जगतो डिजिटल
मरेनही डिजिटल
डिजिटल वाचन सुरू ठेवा

उणीवा आणि ओळख

तू काय आहेस हे तुझं तुला कळल्याशिवाय तुला कोण हवं आहे हे कसं कळेल? आपण आपल्याच जगण्याच्या बेड्या तोडून बाहेर पडलो नाही तर दुसर्‍याचं जगणं आपल्याला कसं समजून घेता येईल. तुला कळतंय का, आपण एका मोठ्ठ्या जिगसॉ पझलचे तुकडे आहोत. आपल्या आजूबाजूला कुठले तुकडे बरोबर बसतात हे बघण्यासाठी आपण आपल्या तुकडेपणातून बाहेर यायला नको? उणीवा आणि ओळख वाचन सुरू ठेवा

झाडे

दिवसभराचा मानसिक थकवा घालवायला मी जोरजोराने व्यायाम करतो. शेवटी तिथल्या तिथेच आडवा होतो, शवासन किंवा कूल डाउन वगैरे नुसत्या सबबीच. पंख्याचा गरम वारा अंगावर भिरभिरत राहतो. इन द मूड फॉर लव्ह मधलं वेडं व्हायोलीन आजवरच्या अनेक उष्ण पानगळींच्या दिवसांची आठवण करून देत रहातं. झाडे वाचन सुरू ठेवा

वेडेपणाचे पुरावे

जपून ठेवावेत आपल्या वेडेपणाचे पुरावे

जपून ठेवावीत गर्लफ्रेंड असतानाची मोबाईल बिलं
जपून ठेवावीत नखं नाण्यांनी खरवडलेली रिचार्ज कुपन्स
भूतकाळाबद्दल कसलीही आपुलकी उरली नसली तरी
जपून ठेवावेत आपल्या वेडेपणाचे पुरावे वेडेपणाचे पुरावे वाचन सुरू ठेवा

अंधार बोलतो

अंधार बोलतो
अंधार बोलतो
तेव्हा सांगतो
माणूस डोळे मिटून करतो
त्या विचारांच्या गोष्टी अंधार बोलतो वाचन सुरू ठेवा

मुंबई

उदास दिव्यांची लखलख मुंबई
घाम उन्हाची भगभग मुंबई
समिंदराची रखैल मुंबई
पैशापाण्यानं सचैल मुंबई मुंबई वाचन सुरू ठेवा