(Krrish)Entry for July 09, 2006

क्रिश! भारीच टाईमपास पिक्चर आहे बुवा. हा पिक्चर सरळसरळ दोन भागात विभागला जातो.
इंटरव्हलच्या आधीचा भाग- फुल्टू बॉलिवूड ईष्टाइल प्रेमकहाणी आणि ती सुद्धा ‘देसी बाबू शहरी मेम’ च्या घिस्यापिट्या फॉर्मुल्यातली. राकेश रोशन नामक दिग्दर्शक ह्या स्टोरीच्या पॅकेजिंग मधे खर्‍या अर्थानी काम करतो. बहादूरची कालीचरण स्टोरी म्हंजे निव्वळ धमाल!
खरा पिक्चर सुरु होतो तो इंटरव्हल नंतर. सिंगापुरात पोचल्यानंतर, गावाकडच्या भोळ्याभाबड्या क्रिश्नाचं सिंगापुरमधे धूम मचवणार्‍या क्रिशमधे बदलणं मस्त दाखवलं आहे. बाकी इंटरव्हलनंतर फक्त उड्या आणि स्पायडरमॅन/ सुपरमॅन/नीओ यांच्या ष्टायलीचा रीमिक्स केलेली मारमारी आहे. जे इंग्लिश पिक्चर बघतात त्यांना पिक्चरच्या क्लायमॅक्स मधे अगदी एक्स मेन पासून मायनॉरिटी रिपोर्ट पर्यंत कशाचीही उचलेगिरी वाटेल!
ऍक्शन सीन्ससाठी र्‍हितिकनी खरंच खूप मेहनत घेतली. तो काही जेट आणि ब्रुस सारखा ली कुटूंबातला नाही! आणि स्पायडी व सुपरमॅनसारखा फुल्टू ऍनिमेटेडही नाही. तरीही पिक्चरमधले सीन्स इम्प्रेसिव्ह वाटतात ते त्याने घेतलेल्या अजोड मेहनतीमुळेच. खरंतर एच.बी.ओ आणि ए.एक्स.एन च्या चॅनल्सवर पोसल्या गेलेल्या आपल्यासारख्यांना ऍनिमेशन बाळबोध वाटतं. जे प्रियांका चोप्रा बघून पकलेत त्यांनी र्‍हितिककडेही पाहावं. त्याच्याएवढ्या नाही पण थोड्याफार मसल्स असाव्यात आपल्याही शरीरावर!
बघा, बघावासा वाटला तर नाहीतरी लोकांनी त्याला लहान पोरांचा म्हणून बदनाम केलाच आहे…!

Entry for April 25, 2006

माझे हे कॉलेजाचे शेवटचे वर्ष. म्हणून ठरवलं यावर्षी (तरी) भरपूर अभ्यास करावा आणि सर्व मित्रांसोबत सुट्टीकालीन शिकवणी वर्गात (म्हंजे summer vacation batch हो) नाव घालून आलो…

हुश्श..!! आलो एकदाचा घरी..

रोज दिवसाअखेरीस असा थकून गेलेला असतो मी. मित्र-मैत्रिणी असतातच सोबत; म्हणून काय ३-३ तास त्या खचाखच भरलेल्या वर्गात एका आणि एकाच ठिकाणी बसून काढायचे. छ्या, अगदीच नैया पार होऊन जाते बघा. आणि भरीस भर म्हंजे जोडीला अभ्याससुद्धा करायचा असतो. काय करणार, एका डोळ्याने शेवटच्या वर्षी मिळवण्याच्या उच्चप्रथम श्रेणीची स्वप्ने आणि दुसर्‍या डोळ्याने फळ्यावरची रुक्ष आकडेमोड वहीत उतरवताना दिवस संपतो. म्हंजे कसा……………………………..असा..-

मी: (सख्ख्या शेजारी मित्राला) ए, काल कॅरेरा जीटी चालवली…

मंदार: काय म्हणतोस जिंकलास मग?

मी: नाहीतर काय! च्यामारी माझ्याहून बेश्ट ड्रायव्हर या जगात नाय…

आम्ही दोघेही वरील किंवा कुठलीही चारचाकी फक्त संगणकावरील ‘वेगाची गरज: हवीहवीशी'( Need for Speed: Most Wanted) या खेळामध्येच चालवतो. ह्याच दळभद्री क्षणी मी मग एका अतिकटू सत्याच्या भक्ष्यस्थानी पडलो. ते म्हणजे मी आणि शिक्षकमहाशय दोघंही वेगवेगळ्या समस्या सोडवत आहोत.

मी: अरे एक गोष्ट येतेय का तुझ्या लक्षात? (त्याच्या उत्तराची वाटही न बघता मी बडबडतो) मी तर कॅरेरा नुसतीच चालवली, पण मालपाणी तर कॅरेराच्या स्पीड ने अकाउंटंन्सी करतो.

हा मालपाणी, डिग्र्यांची (पदवी पेक्षा डीगरीच जास्त ग्रामीण वाटतं बोवा!) लांबलचक माळ गळ्यात टाकून फिरणारी एक ६ फुटी गुढी आहे. गुढीच्या कडुनिंबाची चव जशी जिभेवर रेंगाळते ना तसाच मालपाणीने शिकवलेला माल; म्हंजे अभ्यास डॉक्याच्या भायेर म्हणून येत नाही.

My Poem

I watched you, I listened to you
Everything I risked in my love for you
But was there anything for me in your mind?
the game was so cruel that the death was kind
Someday I realised that you faked me
and doing nothing I sat down with head in my knee
No matter that you loved me not
but you were in my heart, to whom my hands belong
I lost my love, I lost meaning of my life
Really speaking, my life was her but the meaning was mine
Not the love but its meaning turned sore
my life continued without that glamour and glare
Death was so kind, that I left my body with hopes of great afterlife

This is what I call great
Writing a song about you
on this heavenly slate
Sitting in this chair
Hearing the bagpipe sound like blurr!
Being so happy one;
Why should I think about YOU BLOODY GIRL?

Entry for November 06, 2005

Currently trying to write an essay in Environmental Challenges. I am really horrified and scared to see what our ancestors have done. I am damn sure about the fact that Hurricane Katrina, Tsunami and latest Mumbai Cloudburst are the ultimate results of Global Warming and General Environmental Mismanagement.