Posts Tagged ‘उजेड

04
मे
10

एक अंधारा खड्डा

दुरून उजेडाचं मुख वाटणार्‍या प्रचंड अंधार्‍या खड्ड्यात कधी पडलो कळलंच नाही. दाणकन्‌ आपटलो, उजव्या भुवईवर जखम झाली. एक प्रत्यक्ष आणि हवं असणारं, असे दोन भाग दिसायला लागले तेव्हापासून. वाचन चालू ठेवा ‘एक अंधारा खड्डा’
14
सप्टेंबर
09

पांढराभक्क उजेड काळाढुस्स अंधार

साधारण दोन महिन्यांपूर्वीच मी लिहिलं होतं, दोन ओळींतच अडून राहिल्याबद्दल. ह्या गेल्या दोन महिन्यात खूप काही घडलं, घडता घडता राह्यलं, कधी भिती वाटली, कधी एकटेपणा वाटला, प्रचंड आनंदही झाला. पण त्या दोन ओळींमध्ये अजूनही अडकलो होतो. काल रात्री साडेबारा-पावणेबाराच्या दरम्यान काहीतरी झालं. कविता लिहिली. यमकं वगैरे काही नाही. फक्त एकाखाली एक ओळी. मुक्तछंद म्हणा हवंतर…
जो काही कोलाज लिहिला गेला तो असा…
पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार
गरगरणारा पंखा
किरकिरणारे रातकिडे
दूर कुठेतरी वाजणारा भोंगा
भुंकणारी कुत्री
’जागते रहो’
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
इथेच कुठेतरी सभोवताली
एकटा मी.
मांज्यात पंख अडकून
भेलकांडत खाली आलेलं ते कबूतर
कुठल्या नजरेनं बघितलं असेल त्यानं पतंगाकडे
तुटलेल्या पंखाची जखम हुळहुळताना
त्या रात्री कुत्रीही जरा शांत होती;
म्हणे अमावस्या होती.
बाहेर काळाढुस्स अंधार
सिगारेटचं जळतं टोक सुद्धा सूर्य वाटतं.
नव्हे; ती होती चिलीम, अफूची
कबूतरांवर पसा पसाभर धान्य फेकणार्‍याकडे
आशाळभूतपणे बघणार्‍या थोट्या भिकार्‍याची
रातकिडे किरकिरतायत अजूनही
मी ही असाच, इथेच,
अडकलेला
स्वाभिमानी
रांगेतल्या पुढच्यांची हांजी हांजी करत
पुढे जाणार्‍या तद्दन भिकार्‍यांविरुद्ध
वॉचमनचा प्रेमळ सल्ला
’जागते रहो’

साधारण दोन महिन्यांपूर्वीच मी लिहिलं होतं, दोन ओळींतच अडून राहिल्याबद्दल. ह्या गेल्या दोन महिन्यात खूप काही घडलं, घडता घडता राह्यलं, कधी भिती वाटली, कधी एकटेपणा वाटला, प्रचंड आनंदही झाला. पण त्या दोन ओळींमध्ये अजूनही अडकलो होतो. काल रात्री साडेबारा-पावणेबाराच्या दरम्यान काहीतरी झालं. कविता लिहिली. यमकं वगैरे काही नाही. फक्त एकाखाली एक ओळी. मुक्तछंद म्हणा हवंतर… वाचन चालू ठेवा ‘पांढराभक्क उजेड काळाढुस्स अंधार’

16
जुलै
09

फक्त दोन ओळी…

पांढराभक्क उजेड
बाहेर काळाढुस्स अंधार

परवापासून फक्त ह्याच आणि एवढ्याच ओळी सुचल्यात. ह्यापुढे लिहायला ओळीच सुचत नाहीयेत. आणि ओळी सुचायला कसलीच कल्पनाही डोळ्यासमोर येत नाहीये. Absolutely nothing. वाचन चालू ठेवा ‘फक्त दोन ओळी…’




एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................