Posts Tagged ‘ऊन

24
जुलै
12

अंतर

अंतर जाणवतं जेव्हा
शब्द अडखळतात
मारतात बुबुळांना धक्के
बाहेर पडायला… वाचन चालू ठेवा ‘अंतर’

14
नोव्हेंबर
11

खिडकीत

रोज होते तशीच सकाळ आजही झाली. रोज जातात तसेच आजही ते वेळेवर ऑफिसला निघून गेले. रोज वाजतात तसेच आजही साडेदहा वाजले. आणि ती तीचे लांबसडक केस विंचरत खिडकीत येऊन उभी राहिली. वाचन चालू ठेवा ‘खिडकीत’

14
ऑगस्ट
10

मानसीचा चित्रकार तो…

अमावस्येच्या रात्रीचा गडद अंधार, लाल शेंदरी पहाट, आणि आता कोवळं ऊन झरोक्यातून आत येऊ लागलं. त्या ताज्यातवान्या उन्हानं खोली उजळून निघाली होती. कवडश्यात धूळ खेळत होती. मधूनच हवेच्या झुळकीने गडबडून जात होती. वाचन चालू ठेवा ‘मानसीचा चित्रकार तो…’
16
जानेवारी
10

Personal Paradigm Shift- पर्सनल पॅराडाईम शिफ्ट

धनन धनन धन एकसारखा गुंजणारा आवाज. जड झालेले श्वास. अनियमित. डोक्यात अपयशाचं भय. डोक्यात ड्रम बडवल्यासारखं. मुंबईत असह्य उकडू लागलंय परत. दूर रस्त्यावरून वेगाने जाणार्‍या वाहनांची भिती वाटते. पलंगावर पडल्या पडल्या भिनतो तो वेग रक्तात. आणि मग अशक्य होतं झोपणं. फुल स्पीडवर फिरणार्‍या फॅनखालीही कपाळावर घाम साचू लागतो. घाबरून डोळे बंद करावे तरी जाणवते ती फक्त आग. कसलातरी personal paradigm shift करायची. धनन धनन धन र्‍हिदम वाढत राहतो. आणि बंद डोळ्यात आग. वाचन चालू ठेवा ‘Personal Paradigm Shift- पर्सनल पॅराडाईम शिफ्ट’

08
सप्टेंबर
09

ऊन

आज कितीतरी दिवसांनी इथे मुंबईत ऊन पडलंय. इतके दिवस पावसाने झोडपलेली, मंदावलेली मुंबई आता परत नेहमीच्याच वेगाने कामाला लागलीये. तर या अशा ऊन्हाचीच ही कविता…
उन पडलंय आज, चमकदार उन.
काळ्या ढगांखालचं धुरकट जग नाहीसं करून,
उन पडलंय आज, चमकदार उन.
उन पडलंय आज, चमकदार उन
कडाडणार्‍या मग्रूर विजांना उत्तर म्हणून,
उन पडलंय आज, चमकदार उन.
सगळंच कसं दिसतंय आता
स्वच्छ, सुंदर आणि गरम
चमकतायत आता प्रत्येकाचे डोळे
आणि त्यातले खरेखुरे भाव
माणसा माणसांतल्या कटू सत्याची ओळख देऊन
उन पडलंय आज, चमकदार उन.
अगदी काल रात्रीपर्यंत भिजून कुडकुडणारा तो
मनातून मात्र आनंदीच असायचा
आता परत त्याच्या कपाळावर आठी
आणि एकट्यानेच चालण्यात पूर्वीचा वेग
भुवईत जमणार्‍या घामाबरोबरच माणसांना दूर करून
उन पडलंय आज, चमकदार उन.

आज कितीतरी दिवसांनी इथे मुंबईत ऊन पडलंय. इतके दिवस पावसाने झोडपलेली, मंदावलेली मुंबई आता परत नेहमीच्याच वेगाने कामाला लागलीये. तर या अशा ऊन्हाचीच ही कविता… वाचन चालू ठेवा ‘ऊन’




एकूण वाचक

  • 32,575 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................