तू काय आहेस हे तुझं तुला कळल्याशिवाय तुला कोण हवं आहे हे कसं कळेल? आपण आपल्याच जगण्याच्या बेड्या तोडून बाहेर पडलो नाही तर दुसर्याचं जगणं आपल्याला कसं समजून घेता येईल. तुला कळतंय का, आपण एका मोठ्ठ्या जिगसॉ पझलचे तुकडे आहोत. आपल्या आजूबाजूला कुठले तुकडे बरोबर बसतात हे बघण्यासाठी आपण आपल्या तुकडेपणातून बाहेर यायला नको? उणीवा आणि ओळख वाचन सुरू ठेवा
टॅग: ओळख
दळण
दळण तेच दळत रहातं
जातं फक्त बदलत रहातं दळण वाचन सुरू ठेवा
ओळख
मी जन्माला आलो. मला एक आयुष्य मिळालं. मग मी मोठा झालो हळुहळू. मला एक ओळख मिळाली. थोडी खरी होती, थोडी खोटी. खरी ओळख खरी करण्यासाठी आणि खोटी ओळख पुसण्यासाठी धडपड सुरू झाली. ओळख वाचन सुरू ठेवा