शितू आणि चानी

काल रात्री उशिरापर्यंत वाचत होतो. गोनीदांची शितू वाचून पूर्ण केली. वाचून पूर्ण केली, पुस्तक खाली ठेवलं. दोन क्षण अगदी शांत बसलो. आजूबाजूलाही सगळीच शांतता पसरली होती. शितूच्या आयुष्यातील एकेक क्षण जसा डोक्यात फिरत होता तशीच आठवली ती चानी. चानी, चिंत्र्यंची चानी. शितू आणि चानी वाचन सुरू ठेवा

शाळा- एक अनुभव

सर्वात आधी सांगतो की मी मिलिंद बोकील यांची शाळा कादंबरी वाचलेली नाही. आणि दुर्दैवाने शाळा सिनेमा बघून, आता तर ही कादंबरी कसंही करून वाचलीच पाहिजे असं कुतूहलही जागं झालं नाही. तेव्हा फायदा असा की मी शाळा सिनेमा बघायला कोर्‍या करकरीत पाटीने गेलो. शाळा- एक अनुभव वाचन सुरू ठेवा

तो

तो नेहमी रात्रीच लिहायला बसायचा. लिहीताना अडलंच कुठे तर मग पहात बसायचा खिडकीतून समोरच्या लॅंपपोस्टाकडे. मग त्या लॅंपपोस्टाचा पिवळा आणि त्याच्या टेबललॅंपमधल्या सीएफेलचा पांढरा मिळून एक फिकट पिवळा जो रंग त्याच्या टेबलवर खेळत असे त्यावर तो परत एकदा लिहू लागे विनासायास. तो वाचन सुरू ठेवा