उणीवा आणि ओळख

तू काय आहेस हे तुझं तुला कळल्याशिवाय तुला कोण हवं आहे हे कसं कळेल? आपण आपल्याच जगण्याच्या बेड्या तोडून बाहेर पडलो नाही तर दुसर्‍याचं जगणं आपल्याला कसं समजून घेता येईल. तुला कळतंय का, आपण एका मोठ्ठ्या जिगसॉ पझलचे तुकडे आहोत. आपल्या आजूबाजूला कुठले तुकडे बरोबर बसतात हे बघण्यासाठी आपण आपल्या तुकडेपणातून बाहेर यायला नको? उणीवा आणि ओळख वाचन सुरू ठेवा

शितू आणि चानी

काल रात्री उशिरापर्यंत वाचत होतो. गोनीदांची शितू वाचून पूर्ण केली. वाचून पूर्ण केली, पुस्तक खाली ठेवलं. दोन क्षण अगदी शांत बसलो. आजूबाजूलाही सगळीच शांतता पसरली होती. शितूच्या आयुष्यातील एकेक क्षण जसा डोक्यात फिरत होता तशीच आठवली ती चानी. चानी, चिंत्र्यंची चानी. शितू आणि चानी वाचन सुरू ठेवा

तू नसताना

एकटेपणाची गातो गाणी तू नसताना
मोजत बसतो श्वास एकटे आलेगेले
तू नसताना तू नसताना वाचन सुरू ठेवा

ब्राह्मणी प्रेम!

गरम फुलक्यावर ओघळणार्‍या तुपासारखं
मऊसूत करून जातेस जगणं ब्राह्मणी प्रेम! वाचन सुरू ठेवा

Happy Valentine’s Day

ती:
त्याला बाय करून बसमधे… तो पुढच्या सिग्नलला डावीकडे वळून झूऽऽऽम…
एकमेकांचे हात हातात घेऊन दोघंही शांत बसलो होतो. माझं कुठे लक्ष होतं देव जाणे. कदाचित डोळे मिटूनही घेतले असतील मी. त्यानी घामेजलेला त्याचा हात हातातून कधी सोडवून घेतला, बॅगेतून रेड मार्कर कधी काढला आणि दुसर्‍या हाताने माझा हात अलगद पकडून… इतकं सुंदर चित्र कधी गोंदवलं… काही म्हणता काही कळलंच नाही. आणि तो ही अवलियाच! शांतपणे बसला माझी समाधी सुटण्याची वाट पहात. फुलांच्या दोन डहाळ्या, त्यावर छोटीशी नाजूक फुलं एकमेकांकडे बघणारी आणि एकूण आकार हार्ट-शेप्ड! वॉव!! त्यानंतर त्याच्या ग्रे डोळ्यांत खोलवर बघायची चव काही औरच होती. वेगळी मिठी मारायची गरजच भासली नाही मग! Happy Valentine’s Day वाचन सुरू ठेवा

समजा मी उद्या मेलो

समजा मी उद्या मेलो
आणि तिला कळलंच नाही तर? समजा मी उद्या मेलो वाचन सुरू ठेवा

भावना…

भावना, भाव ना देते मला
प्रेमाची किंमत नाही तिला, शिव्या देते मला.

मित्रांनो, या माझ्या मदतीला,
सगळे मिळून तिच्या घरी चला.

“हो!” म्हणाली मला तर लगेच टळा,
नाहीतर मारून टाका मला.

अरे, ही नाहीतर दुसरी नक्कीच मिळेल तुला,
म्हणे ’आल्हाद’ प्रेमात अडकलेल्या, त्याला.

११ मार्च ०९
धुळवड

तू हवा होतास…

परवा अचानक एक कविता सुचली. आता कविता अचानकच सुचतात हे ही खरंच! पण ही कविता मात्र वेगळी आहे. मला मुलीच्या दृष्टीकोनातून सुचलेली…

तू हवा होतास…

मन बरसताना माझे तू हवा होतास.
ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.

ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,
अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.
उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.

पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,
उडणारा पदर तुझ्यासाठी थांबला होता.
वाहणारे ओहोळ सावरायला तू हवा होतास.

हिरवाई सगळीकडे, झाडं वाढलेली चिकार,
काट्यात झुलणारा गुलाब तुझ्यासाठी थांबला होता.
त्याच्या सुवासाला तू हवा होतास.