मी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का?

मी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का?
संधिकालच्या धुंद क्षणांना पाऊस देशील का? मी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का? वाचन सुरू ठेवा

ओळख

मी जन्माला आलो. मला एक आयुष्य मिळालं. मग मी मोठा झालो हळुहळू. मला एक ओळख मिळाली. थोडी खरी होती, थोडी खोटी. खरी ओळख खरी करण्यासाठी आणि खोटी ओळख पुसण्यासाठी धडपड सुरू झाली. ओळख वाचन सुरू ठेवा

तिच्यामाझ्यात

तलम वस्त्रांकित ती
अतीव लज्जेने चूर
हस्तांदोलन बदले
मिठीत कधी न कळे
गूढ शरिरी उन्मुक्त
एकात्म भावी शून्यत्व
ओठ थरथरे पुन्हा
दाताखाली दाबूनी ती
सर्व अडथळे दूर
तिच्यातले माझ्यातले
सर्वस्व देऊनी तिला
हास्य ओठांवर मूक…

तलम वस्त्रांकित ती
अतीव लज्जेने चूर
हस्तांदोलन बदले
मिठीत कधी न कळे तिच्यामाझ्यात वाचन सुरू ठेवा

मी मैत्रीण आणि प्लॅटफॉर्म

लिंकरोडच्या पल्याड आहे तिचं घर
तशी घरं आहेत अनेक; पण तिचं विशेष
मी इकडे दूर फार पूर्वेला
सोबतीला माझ्या हिरवाई आणि डोंगर दर्‍या.
तिच्या घराजवळ समुद्र अथांग
जसं तिचं मन अन्‌ डोळ्यांचा न थांग.
भेटते मला कधीतरी शेवटच्या प्लॅटफॉर्मवर
शांतपणे बसून हातात हात घेऊन
बोलत रहाते उगाच नसत्या विषयांवर.
माझ्या डोळयातल्या भावना तिला कळत नाहीत असं नाही
पण लोकलच्या धडधडाटात आयुष्य किती वेगानं निघून जातं नाही?
ती पश्चिमेला, मी पूर्वेला,
जोडणारा आम्हाला सूर्य
तो सकाळी सकाळी भाजवतो मला
संध्याकाळी तिच्या केसात खेळत बसतो.
नवल वाटतं त्याचं
कसं जमतं याला?
त्या सुगंधात गुंतून
सहीसलामत बाहेर यायला
मग कधीतरी लोकलच्या दारातच ती उभी राहील,
पुढच्या स्टेशनची वाट बघत.
लोकल भरधाव पळत असेल
स्टेशनांना मागे टाकत.
डोळे पाणावतील तिचे
माझं स्टेशन मागे टाकल्यावर;
जिथे भेटायचो आम्ही शेवटच्या प्लॅटफॉर्मवर
तिथे परत भेटेल मला माझी लोकल गेल्यावर…
३० एप्रिल २००९
१.५७ PM

महिन्याभरापूर्वी लिहीलेली कविता, आत्ता ब्लॉगवर टाकायचं सुचतंय. कितीतरी वेळ काय नाव द्यावं कवितेला हेच सुचत नव्हतं. आपल्याला काही सुचल्यास नक्की सांगा.

लिंकरोडच्या पल्याड आहे तिचं घर

तशी घरं आहेत अनेक; पण तिचं विशेष

मी इकडे दूर फार पूर्वेला

सोबतीला माझ्या हिरवाई आणि डोंगर दर्‍या.

तिच्या घराजवळ समुद्र अथांग

जसं तिचं मन अन्‌ डोळ्यांचा न थांग.

भेटते मला कधीतरी शेवटच्या प्लॅटफॉर्मवर

शांतपणे बसून हातात हात घेऊन

बोलत रहाते उगाच नसत्या विषयांवर.

माझ्या डोळयातल्या भावना तिला कळत नाहीत असं नाही

पण लोकलच्या धडधडाटात आयुष्य किती वेगानं निघून जातं नाही?

ती पश्चिमेला, मी पूर्वेला,

जोडणारा आम्हाला सूर्य

तो सकाळी सकाळी भाजवतो मला

संध्याकाळी तिच्या केसात खेळत बसतो.

नवल वाटतं त्याचं

कसं जमतं याला?

त्या सुगंधात गुंतून

सहीसलामत बाहेर यायला

मग कधीतरी लोकलच्या दारातच ती उभी राहील,

पुढच्या स्टेशनची वाट बघत.

लोकल भरधाव पळत असेल

स्टेशनांना मागे टाकत.

डोळे पाणावतील तिचे

माझं स्टेशन मागे टाकल्यावर;

जिथे भेटायचो आम्ही शेवटच्या प्लॅटफॉर्मवर

तिथे परत भेटेल मला माझी लोकल गेल्यावर…

३० एप्रिल २००९

१.५७ PM

ही कविता एका मुंबईकराची आहे. एका पश्चिम रेल्वेवर रहाणार्‍या मुंबईकराची आहे. विशेषतः अंधेरी ते मालाड या पट्ट्यात रहाणार्‍या पश्चिम रेल्वेवरच्या एका मुंबईकराची आहे. प्रेम ही जागतिक भावना असल्याने इतरांनाही भावेल. पण खात्रीनं, वरील मर्यादांमधे जवळची किंवा आपली वाटेल. कदाचित ह्या मर्यादांमुळेच इतके दिवस ब्लॉगवर टाकण्याचा मूड लागला नसेल…

असो.

आल्हाद