रोजच्या वापरात येणारी, नेटवर लीगली फुकट मिळणारी, अनेकदा विंडोजसोबत येणार्या सॉफ्टवेअरपेक्षा चांगल्या रितीने काम करणारी काही सॉफ्टवेअर्स व युटिलिटीज्… इथे देतोय. सर्वांनाच उपयोग होईल अशी आशा आहे.
ओपनऑफिस ३ | एमेस ऑफिस इतकाच कार्यक्षम, कळायला सोपा आणि सिस्टीमवर हलका असा हा ऑफिस सूट, नेहमीच एमेस ऑफिसच वापरणार्यांनाही भुरळ घालतो. शिवाय ओपनऑफिसची फाईल .doc, .docx, .ppt, .xls वगैरे एमेस ऑफिसच्या फॉरमॅट्स मधे सेव्ह करता येते. आणि एमेस ऑफिस मधे नसलेला “export to pdf” हा ऑप्शन तर खूपच कामाचा. | |
![]() |
||
विनॅम्प ५.५२ | कॉम्प्युटरवर गाणी वगैरे ऐकताना अजूनही अनेकजण विन्डोज् मिडीया प्लेअरच वापरतात. उजव्या कोपर्यात वाजणार्या गाण्यांची यादी ठेवून बाकी उरलेल्या आख्ख्या स्क्रीनवर धुमाकूळ घालणार्या त्या वेड्यावाकड्या रेषा आणि रंग… विनॅम्प सगळ्या प्रकारचे ऑडिओ फॉरमॅट्स वाजवतो. कोडेक नाही अशी फाल्तू सबब तो दाखवत नाही. आतातर यावर आयपॉडसुद्धा सिंक (sync; किचनमधली नाही!) करता येतो! | |
![]() |
||
व्हिएलसी प्लेअर १ | ऑडिओला विनॅम्प आहे तर व्हिडिओला काय? विनॅम्पमधेही व्हिडिओ बघता येतात पण खरंतर पकावगिरी आहे. व्हिडिओला बेस्ट म्हणजे व्हिएलसी प्लेअर. ह्याची बीटावस्था नुकतीच संपली. त्याच्या स्लोगनप्रमाणेच अक्षरशः कोणताही व्हिडिओ प्ले करतो आणि नेटवर स्ट्रीमही करतो. | |
![]() |
||
७-झिप ४.६५ | कंप्रेशन किंवा झिपिंग यामधे सगळेच हात मारतात असं नाही. अनेकांच्या कॉम्प्युटरमधे जुन्या विनझिपचं अनंतकाळ चालणारं ट्रायलव्हर्शन पडलेलं असतं. त्या बाबा आदम जमान्यातल्या अर्धवट चालणार्या ट्रायलव्हर्शनला उत्तम पर्याय म्हणजे हे लेटेस्ट फ्रीवेअर. झिप, रार, टार शिवाय ७झिप या स्वतःच्या फॉरमॅटमधेही फाईल सेव्ह करतो. | |
![]() |
||
फॉक्सिट रिडर ३ | अडोब/ऍक्रोबॅट रिडर तुमच्या कॉम्प्युटरवर फार खाऊन खाऊन सुटलेल्या ढोल्या माणसासारखा हळूहळू चालतो का? नाही, खरंय ते. तो २० एम्बीचा गेंडा चालवण्यापेक्षा ३ एम्बीचा फॉक्सिट रिडर कधीही चांगलाच! ह्याचं सगळं फटाफट फाईल चालू बंद सगळंच. क्रॅश म्हणून नाही. वापरून तर बघा, म्हणजे आपोआप कळेल मी काय, म्हणतोय ते! | |
![]() |
||
जिम्प् २.६ | तुमच्या कॉम्प्युटरवर चालणार्या त्या पायरेटेड फोटोशॉपला तितकाच कड्डक पर्याय. ह्या जिम्पच्या नावातच सगळं आलं. (GIMP – GNU Image Manipulation Program) शिवाय फोटोशॉपची सवय असणार्यांसाठी ह्याचा चेहरामोहरा (UI) अगदी फोटोशॉपसारखा करता येतोच. तेव्हा, फुकट फोटोशॉप म्हणजे जिम्प्! | |
![]() |
||
सीक्लिनर २.२० | विंडोज कधी अचानक स्लो होतं, एखादी वेबसाईट नीट लोड होत नाही, हार्डडिस्कवरील रिकामी जाग अचानक भरते, काही फाईल्स डिलीटच होत नाहीत, काही फाईल्स, सॉफ्टवेअर्स काढून टाकले तरी त्यांचे शॉर्टकट्स, रजिस्ट्री एन्ट्रीज् तशाच पडल्यात; ह्या व अशा अनेक समस्या आपल्याला छळतात. त्यावर मस्त उपाय. इसे वापरीये और फरक देखिये. टिंग टींग टिडींग! | |
![]() |
||
गमभन आणि बरहा | गमभन आणि बरहाबद्दल काय लिहू? जे नियमित ब्लॉगिंग करतात ते प्रामुख्याने या दोन पैकीच एक टूल वापरतात. गमभनचं ऑनलाईन टूल आहे; बरहाचं नाही. पण बरहाचे बरहापॅड, बरहाकन्व्हर्ट, बरहासॉर्ट असे उपयुक्त प्रॉग्रॅम्सही जोडीला आहेत.अगदीच फरक करायचा झाला तर, गमभन ओंकार जोशी यांनी बनवलंय तर बरहा शेषाद्रीवसु चंद्रशेखरन् यांनी. शिवाय इथे द्यायला बाजूचं वेब बटन/ग्राफिक लिंक लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल ओंकार जोशींचे आभार | |
![]() |
बघा वापरून आणि सांगा मला कशी काय वाटली ही फुकट आणि कार्यक्षम सॉफ्टवेअर्स!
धन्यवाद.
आल्हाद
Advertisements